त्यांनी फक्त घरच पळवायचे बाकी ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 00:35 IST2017-03-06T00:35:25+5:302017-03-06T00:35:25+5:30

धुळ्यातील चोरी : घरातील सर्व वस्तू लांबविल्या

They just left the house to run away | त्यांनी फक्त घरच पळवायचे बाकी ठेवले

त्यांनी फक्त घरच पळवायचे बाकी ठेवले

धुळे : देवपुरातील  ओसवालनगरात उच्छाद घालताना चोरट्यांनी  वंदना बाळकृष्ण पवार  यांचे  घरच तेवढे चोरून नेणे बाकी ठेवले. चोरट्यांनी बंद घरातून सोफा, पलंगासह फ्रीज, टीव्ही,  गॅस शेगडी यासह सर्वच संसारोपयोगी वस्तू लांबविल्या. याप्रकारे सुमारे एक ते दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांंनी लंपास केला़ 
ओसवालनगरातील प्लॉट ५२ मध्ये राहणाºया वंदना  पवार या मुलीसह  ४ रोजी रात्री याच भागातील  त्यांच्या आई-वडिलांकडे थांबल्या होत्या़ ही संधी साधताना  चोरट्यांना घरात पैसे व दागिने मिळाले नाही. तेव्हा चक्क सोफासेट, पलंग, डबल डोअर फ्रीज, सिलिंडरसह गॅस शेगडी, टीव्ही, सोफा तसेच कपाटातील साड्यांनी भरलेली बॅग असा सुमारे एक ते दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला़
रविवारी सकाळी  वंदना पवार घरी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या घटनेची माहिती देवपूर पोलिसांना देण्यात आली़  घराच्या संरक्षण भिंतीच्या गेटचे कुलूप तुटलेले दिसून आले नाही़ त्यामुळे चोरट्यांनी सर्व साहित्य गेटवरुन उचलून  चारचाकी वाहनाद्वारे नेले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे़

Web Title: They just left the house to run away