शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

थाळनेर पोलिसांची सतर्कता, गुरांची तस्करी केली उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 17:53 IST

लाखोंचा मुद्देमाल जप्त; आरोपी फरार

थाळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवैधरित्या गुरांची होणारी वाहतूक उघड केल्याने १७ लाख ८० हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला़ याप्रकरणातील संशयित आरोपी मात्र फरार झाले आहेत.शिरपूर चोपडा रस्त्यावरुन पहाटे अवैद्यरित्या गोवंश जनावरांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती थाळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना मिळाल्याने त्यांनी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास आपल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, कर्मचारी प्रकाश मालचे, कृष्णा पावरा, उन्मेश आळंदे आदींनी सापळा लावून शिरपूर चोपडा रस्त्यावरील तोंदे गावाजवळ युपी २७ टी २६७२ या कंटेनर वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात ५२ गोवंशीय जनावरे दाटीवाटीने आखूड दोरीने बांधलेली आढळून आलेत. वाहनातील तिनही आरोपी पोलिसांना पाहून फरार झाले आहेत़ थाळनेर पोलिसांनी १७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गुरांना सावेर येथील गोशाळेत पाठविण्यात आले आहे. याबाबत थाळनेर पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचारी प्रकाश मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे