शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचा येथे तणावपूर्ण शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:32 IST

शहरात बुधवारी एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी पोलीसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले हाेते. या संशयितांना सोडून द्यावे या मागणीसाठी ...

शहरात बुधवारी एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी पोलीसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले हाेते. या संशयितांना सोडून द्यावे या मागणीसाठी जमावाने पोलीस स्टेशनला धडक देत पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच पोलीसांना धक्काबुक्की करीन पोलीस स्टेशनवर दगडफेक केली होती. हे करीत असतांना जमावाने पाेलिसांच्या ताब्यातील दोन आरोपींनाही पळवून लावले होेत. जमावाला पांगविण्यासाठी पोलीस निरीक्षकांने गोळीबार केला.यात एकजण जखमी झाला होता. उपजिल्हा रूग्णालयात जखमीला दाखल केले असता, त्याठिकाणी दोन गट भिडले होते. यात एका इसमाचा मृत्यू झाल्याने वातावरण चिघळले होेते.

दरम्यान मुलीचे छेड काढणे, पोलीस स्टेशनवर हल्ला करून दगडफेक करणे तसेच जमावाच्या मारहाणीत एकाचा खून केल्याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.यातील आरोपींची एकूण संख्या २६ आहे. मात्र सर्वजण फरार झालेले असून, शुक्रवारपर्यंत एकालाही अटक करण्यात आलेली नव्हती.

ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात

शहरातछत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्टँड, उपजिल्हा रुग्णालय, जामा मशीद आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. शहरात नंदुरबार,धुळे,जळगाव,शिरपूर आदी ठिकाणचे पोलिस येथे तैनात आह..एस आर पी,दंगा काबू पथकाच्या चार तुकड्या कार्यरत आहेत. शांतता प्रस्थापित राहण्यासाठी१० पोलीस अधिकारी,२१० पोलीस व इतर असे २५० पोलीस कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी नियुक्ती केलेली आहे. जिल्हा पोलिस प्रमुख चिन्मय पंडित शुक्रवारी सकाळ पर्यंत दोडाईचात थांबून होते.

डी वाय एस पी प्रशांत बच्छाव,शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माणे, एल सी बी चे बुधवंत,पो नि हेमंत पाटील, सपोनि सुनील भाबड आदी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

शुक्रवारी सामान्य वातावरण

दोंडाईचात घडलेल्या या प्रकारामुळे घटना घडली तो भाग वगळता शहरातील इतर भागात नेहमीप्रमाणे दैनंदिन व्यवहार सुरू होते. भाजीबाजारही भरलेला होता. मात्र रस्त्यांवर तुरळक गर्दी दिसून येत होती.

बसस्थानकात शुकशुकाट

अगोदरच कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव व बुधवारी घडलेली दंगलीच्या घटनेचा परिणाम बसेसच्या प्रवाशी संख्येवरही झाला. या बसस्थानकात प्रवाशांची गर्दी कमी प्रमाणात दिसून आली. तसेच आगारातर्फेही ज्या ठिकाणी जास्त प्रवाशी आहेत, त्याच मार्गावर गाड्या