आनंदखेडे शिवारातून तालुका पोलिसांनी पकडला अफू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:35 IST2021-04-10T04:35:28+5:302021-04-10T04:35:28+5:30

गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आनंदखेडे शिवारातील भारद्वाज पेट्रोलपंपानजीक एका हॉटेलजवळ अफूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच धुळे तालुका ...

Taluka police seized opium from Anandkhede Shivara | आनंदखेडे शिवारातून तालुका पोलिसांनी पकडला अफू

आनंदखेडे शिवारातून तालुका पोलिसांनी पकडला अफू

गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आनंदखेडे शिवारातील भारद्वाज पेट्रोलपंपानजीक एका हॉटेलजवळ अफूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्चाखाली पथकाने छापा टाकला. कारमध्ये (एमएच १४ ईएच ३३२४) एका गोणीत ५९ हजार ७६० रुपये किमतीचा ९.९३ किलो वजनाचे अफूची बोंडे, फुटलेली बारीक तुकडे असे अंमली पदार्थ मिळून आले. चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने अफूची बोंडे ठेवण्यासाठी तसेच त्या हॉटेल परिसराचा जागेचा वापर करताना दोन जण मिळून आले. याप्रकरणी पाबूराम दुधाराम जाट (२६, रा. आनंदखेडे, ता. धुळे) आणि प्रभुराम भक्ताराम जाट (२२) या दोघांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी करीत त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी अफूसंदर्भात गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करण्यात आली तर याचप्रकरणातील एक जण फरार झाला आहे. पोलिसांनी ५९ हजार ७६० रुपये किमतीची अफू आणि दहा लाखांची कार, दहा हजारांचे गाइंडर मशीन असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्यांच्या विरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Web Title: Taluka police seized opium from Anandkhede Shivara