शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बालमजुरीच्या निर्मुलनासाठी पुढाकार घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 22:04 IST

जिल्हाधिकाºयांचे निर्देश : समाजातील प्रत्येक घटकांनी सक्रिय होण्याचे आवाहन

धुळे : बालमजुरीच्या निर्मूलनासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी सहभाग नोंदवावा़ शहरातील प्रत्येक व्यावसायिकांकडे तपासणी व धाडसत्र राबवून बालमजुरीच्या अनिष्ठ प्रथेचे समूळ उच्चाटन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन देवराजन यांनी केले.कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निदेर्शानुसार ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे़ या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आयुक्त अजिज शेख, सरकारी कामगार अधिकारी किशोर जोशी, महिला व बालकल्याण विभागाचे एम. एम. बागूल, शिक्षण विभागाचे एम. जी. वानखेडे, आरोग्य विभागाचे राजेश बोरसे, गृहरक्षक दलाचे नरेंद्र साळवी आदी उपस्थित होते. येत्या महिनाभरात बाल कामगार प्रथेविरूध्द मोहिमेचा कालबध्द कार्यक्रम राबविण्यात यावा़ यात जिल्हा कार्यक्षेत्रातील बाल कामगार बहुलक्षेत्र निश्चित करणे. खासगी आस्थापनेवर मालक व चालकांकडून बाल कामगार न ठेवणेबाबतचे हमीपत्र लिहून घेणे़ बाल कामगार प्रथेविरुध्द जिल्ह्यातील बाजारपेठ क्षेत्रात रॅली घेणे़ सार्वजनिक ठिकाणी या मोहिमेबाबत स्वाक्षरी मोहिम राबविणे. स्थानिक माध्यमांमधून बालमजुरीच्या अनिष्ठ प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पथनाट्य प्रबोधन करण्यासह आदी उपक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. जिल्हाधिकारी म्हणाले, १९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण एमआयडीसी परिसराची तपासणी करुन १४ वर्षाच्या आतील बालकामगार आढळून आल्यास संबंधित आस्थापनेविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी. महिला व बाल विकास विभागासह शिक्षण विभागाने संयुक्तपणे बालकामगारांची शोध मोहीम राबवावी़ शिक्षकांमार्फत त्यांचे सर्व्हेक्षण करण्यात यावे. पोलिसांशी समन्वय साधून पथके स्थापन करा़ महानगरपालिका प्रशासनासह औद्योगिक सुरक्षा कार्यालयासही या मोहिमेत सहभागी करुन मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.या बैठकीस औद्योगिक विकास महामंडळाचे एम. डी. पटेल, सरकारी कामगार कार्यालयाचे आर. बी. शेळके, बी. एस. दुकळे, डी. यू. बडगुजर, सपना देवरे, जयश्री निकम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे