गौतम हिरण यांचे अपहरणकर्तेंवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST2021-03-17T04:36:56+5:302021-03-17T04:36:56+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर - श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे १ मार्च रोजी त्यांच्या दुकानाजवळून अपहरण करण्यात आले. ७ ...

Take action against the abductors of Gautam Hiran | गौतम हिरण यांचे अपहरणकर्तेंवर कारवाई करा

गौतम हिरण यांचे अपहरणकर्तेंवर कारवाई करा

अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर - श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे १ मार्च रोजी त्यांच्या दुकानाजवळून अपहरण करण्यात आले. ७ मार्च रोजी गौतम हिरण यांचा मृतदेह सापडला. मनसुख हिरेण यांचा देखील मुंब्य्राच्या खाडीत मृतदेह सापडला. या दोन्ही घटनामुळे जैन समाजाला एक प्रकारे धक्काच बसला. मितभाषी व्यापाऱ्यांची निघुर्ण हत्या ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. वेळीच व योग्य तपास न झाल्याने ही हत्या करु शकले. अन्यथा, त्यांचा जीव वाचविता आला असता. या घटनेमुळे जैन समाजात तीव्र आक्रोश असून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. सदर अपहरणकर्ते आणि खुन्यांचा तपास करण्यात यावा. दोषींवर कठोर कारवाई व्हावी. खुनाच्या तपासासाठी लवकरात लवकर एसआयटी स्थापन करण्यात यावी अशी मागणी करत निदर्शने करण्यात आली.

निदर्शने करतेवेळी सुभाष कोटेचा, दीपक चतुरमुथा, उज्वल दुग्गड, मनोज जैन, तुषार जैन सहभागी झाले होते.

Web Title: Take action against the abductors of Gautam Hiran