शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

जामफळ प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला अक्कलपाडा धरणग्रस्तांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 19:41 IST

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील जामफळ प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजारभावाच्या चारपट मोबदला मिळावा, या मागणीसाठी तेथील प्रकल्पग्रस्तांचे तेरा दिवसांपासून ...

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील जामफळ प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजारभावाच्या चारपट मोबदला मिळावा, या मागणीसाठी तेथील प्रकल्पग्रस्तांचे तेरा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अक्कलपाडा धरणग्रस्त कृती समितीने पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांची दखल न घेणाऱ्या प्रशासनाचा त्यांनी निषेधही केला आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सुपीक जमीन ही वेगवेगळ्या प्रकल्पांना संपादित केल्याने घटत आहे. घेतलेल्या जमिनीचा मोबदला व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन याबाबतही शासन नेहमीच बेफिकीर असते. शेतकरी आपल्या जमिनीला आईसमान मानतो. ती विकणे त्याच्या जीवावर येते. अनेक ठिकाणी जमिनी संपादनाला विरोध होतो. जामफळ प्रकल्पग्रस्त जमिनी देण्यास तयार आहेत. ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. पण, त्यासाठी नवा भूसंपादन कायदा २०१२ प्रमाणे बाजारभावाच्या चारपट किंमत दिली पाहिजे, ही त्यांची मागणी अत्यंत वाजवी व रास्त आहे. खरेतर या भागात जमीन अत्यंत सुपीक असल्याने चारपट किंमतसुद्धा कमीच आहे. जामफळ प्रकल्पग्रस्तांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. कुठल्याही प्रकल्पामुळे ज्यांच्यावर अन्याय होतो. ही मंडळी एकटेपणाने लढतात व त्याचाच फायदा सरकार घेते. जिल्ह्यात विखरणच्या धर्मा पाटलांचे प्रकरण हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यातून प्रकल्पग्रस्तांनी व सरकारनेही धडा घेतला पाहिजे. म्हणून इतरांच्या अन्यायाच्या वेळीसुद्धा आपण उदासीन न राहता त्यांना साथ दिली पाहिजे. आम्ही अक्कलपाडा प्रकल्पग्रस्त शेतकरीही एकाकी लढलो. त्यावेळेला कदाचित जामफळ प्रकल्पामुळे विस्थापित होत असलेले, निद्रिस्त असावेत. पण आता तरी, त्यांनी आपल्या स्वतःबरोबरच इतरांवरील अन्यायाच्या विरोधातसुद्धा साथ देऊन लढ्याची तयारी ठेवावी, अशी अपेक्षा अक्कलपाडा धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष कॉम्रेड सुभाष काकुस्ते, उपाध्यक्ष गुलाब चव्हाण, चिटणीस श्रीराम पाटील, भरत नेरे यांनी व्यक्त केली आहे.या योजनेतील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे