शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेडा तालुक्यात दोघांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 22:21 IST

पोलिसात नोंद : विषारी औषधाचे केले सेवन

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील जुने कोडदे आणि निमगुळ या ठिकाणी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत़ याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दोनही घटनांची नोंद करण्यात आलेली आहे़ जुने काडदे येथील घटनाशिंदखेडा तालुक्यातील जुने कोडदे येथील रहिवाशी राजेश अशोक पवार (२३) या तरुणाने ११ आॅक्टोबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास काही तरी विषारी औषध प्राशन केले़ याचा त्याला त्रास होऊ लागल्याने ही बाब घरातील लोकांना कळाली़ त्यांनी तातडीने दोंडाईचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ अधिक उपचारासाठी त्याला धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले़ या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ पोलीस कर्मचारी साळुंखे घटनेचा तपास करीत आहेत़ निमगुळ येथील घटनाशिंदखेडा तालुक्यातील निमगुळ येथील वृध्द रविंद्र गोबा बागल (६५) यांनी राहत्या घरी काहीतरी विषारी औषध प्राशन केले़ ही घटना ४ आॅक्टोबर रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली़ घटना लक्षात येताच त्यांना तातडीने धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले़ याप्रकरणी रविवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ पोलीस कर्मचारी पाटील घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी