उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:35 IST2021-04-06T04:35:06+5:302021-04-06T04:35:06+5:30

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात ४५ मंजूर पदापैकी १५ पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता असून तत्काळ ही पदे भरावीत ...

Sub-district hospital starts cleaning | उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता सुरू

उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता सुरू

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात ४५ मंजूर पदापैकी १५ पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांची कमतरता असून तत्काळ ही पदे भरावीत अशी मागणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा चिकित्सक यांच्याकडे केली आहे. सफाई कामगार नसल्याने उपजिल्हा रुग्णालयात व कोविड सेंटरला अस्वच्छता असल्याचा मुद्दा पालकमंत्री अब्दुल सत्तार व आमदार जयकुमार रावल यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत चर्चेला आला होता. या पार्श्वभूमीवर आमदार जयकुमार रावल यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांना स्वच्छता कर्मचारी देण्याचे सुचविले होते. दोंडाईचा नगपालिकेचे स्वच्छता कर्मचारी दोन्ही ठिकाणी जाऊन परिसर व शौचालय स्वच्छ करीत असल्याचे स्वच्छता निरीक्षक शरद महाजन यांनी सांगितले. दररोज कर्मचारी जाऊन स्वच्छता करीत असल्याने परिसर व आरोग्य विभाग स्वच्छ राहण्यास मदत होत आहे.

Web Title: Sub-district hospital starts cleaning