शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

संस्थेच्या हलगर्जीपणामुळेच विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 22:06 IST

धुळे : संस्थेने पात्र नसलेल्या डाॅक्टरची नियुक्ती करुन केलेला हलगर्जीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोरोण ता. धुळे येथील मतिमंद विद्यालयातील ...

धुळे : संस्थेने पात्र नसलेल्या डाॅक्टरची नियुक्ती करुन केलेला हलगर्जीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोरोण ता. धुळे येथील मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत अतीशय धक्कादायक चाैकशी अहवाल त्रयस्त समितीने समाजकल्याण आयुक्तालयाला सादर केला आहे. मोरोण उपनगरातील सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलीत तातेराव पाटील निवासी मतिमंद विद्यालयात १८ जुलै २०१९ रोजी रोहित पवार या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यु झाला. रोहितच्या पालकांनी चाैकशीची मागणी लावून धरली. त्यांच्या मागणी नंतर समाजकल्याण विभागाने चौकशी देखील केली. मात्र ही चौकशी एकतर्फी असल्यामुळे पालकांनी समाजकल्याण आयुक्तांकडे दाद मागीतली होती. समाजकल्याण आयुक्तांच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीन सदस्यीय त्रयस्थ चौकशी समिती नियुक्त केली होती. या चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणुन डॉ. आर. व्ही. पाटील तर सदस्य म्हणुन अनिता रणदिवे, संजय सोनवणे यांनी काम पाहिले. चौकशी समितीने प्रत्यक्ष शाळेत जाऊन तसेच प्रत्यक्ष साक्षीदार रोहितवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारीका, पालक यांचे जबाब नोंदविले. चौकशी समितीने संस्थेच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. चौकशी समितीने केलेल्या चौकशीअंती रोहितला १७ जुलै २०१९ रोजी ताप व खोकला होता हे परिचारीका ज्योत्स्ना पाटील आणि डॉ. रमेश बोरसे यांनी नमुद केले आहे. यामुळे रोहितला तत्काळ उपचाराची गरज असतांना दुर्लक्ष करण्यात आले. या शिवाय शाळेचे कर्मचाऱ्यांनी देखील दुर्लक्ष केले आहे. शाळेचे सीसीटिव्ही कॅमेरे नेमके त्या दिवशी बंद होते. रात्रपाळीला दोन काळजी वाहकांपैकी कोणीच हजर नव्हते. या गलथान कारभारामुळे रोहितचा नाहक बळी गेला. त्यामुळे या प्रकरणात परिचारीका ज्योत्स्ना पाटील,  डॉ. रमेश बोरसे, मुख्याध्यापीका मंदा इंगळे, अधिक्षक संदिप बडगुजर, काळजीवाहक श्याम पाटील, हेमंत गांगुर्डे यांनी कर्तव्यात कसुर केल्याचे समितीने नमुद केले आहे. चौकशी अहवाल समाजकल्याण आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. त्या नंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे