धुळे : तालुक्यातील बोरकुंड येथील भावेश दिलीप चव्हाण या विद्यार्थी तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना रविवारी सकाळी उजेडात आली़ तो शनिवारी सायंकाळपासून घरातून निघून गेला होता़ त्याचा शोध सुरु असताना तो शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला़ त्याच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची असून वडील शेतकरी आहेत़ त्याला तीन बहिणी असून पैकी दोघींचे लग्न झाले आहे़ तो अतिशय हुशर होता़ बीएस्सीचे शिक्षण त्याने पूर्ण केले होते़ दरम्यान मराठा समाजासाठी असलेले शैक्षणिक आरक्षण त्याला न मिळाल्यामुळे त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे़ तर, त्याला न्याय मिळाला पाहीजे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे निंबा मराठे यांनी केली आहे़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}