शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

शेतीच्या वादातून प्रौढाचा खून केल्याचा दाट संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:01 PM

तीन जणांना अटक : ३१ जानेवारीपर्यंत कोठडी

धुळे : प्रौढाचे हातपाय बांधून विहिरीत फेकून दिल्याची दुर्घटना धुळे तालुक्यातील खंडलाय गावात घडली होती़ याप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे़ त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़धुळे तालुक्यातील बांबुर्ले येथील प्रकाश मालजी शिंदे (५५) हे बुधवारी सकाळपासून बेपत्ता होते़ बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील खंडलाय (बुद्रुक) शिवारातील मधुकर दयाराम पाटील यांच्या शेतातील विहिरीत प्रकाश शिंदे यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला होता़ शिंदे यांचे दोन्ही हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत होते़ त्यामुळे त्यांचा खून झाल्याच्या संशयावरुन हा गुन्हा धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता़बांबुर्ले येथील प्रकाश मालजी शिंदे यांचे खंडलाय शिवारात शेत आहे़ त्यांच्या शेताच्या बाजुला रविंद्र दौलत माळी, प्रविण दौलत माळी आणि सुरेश अर्जुन झाल्टे (कोळी) यांचे शेत आहे़ शेतीच्या कारणावरुन त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरु होते़ याप्रकरणी यापुर्वीही प्रकाश शिंदे यांच्या विरोधात या तिघांनी गुन्हा दाखल केला होता़ त्यानंतर वाद हे नित्याचेच झाले होते़ त्यामुळे पोलिसांना या तिघांवर संशय बळावत होता़ शिवाय या तिनही संशयितांपैकी एक जण सुरत येथे राहतो़ मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो खंडलाय येथेच होता़ त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीच बळावला़ साहजिकच पोलिसांनी रविंद्र दौलत माळी, प्रविण दौलत माळी आणि सुरेश अर्जुन झाल्टे (कोळी) या तिघा संशयितांना ताब्यात घेतले़ त्यांची चौकशी करुन त्यांनाही अटकही केली़ त्यांना न्यायालयात हजर केले असता ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़दरम्यान, धुळे तालुक्यातील खंडलाय येथील मधुकर पाटील यांच्या शेतातील विहिरीत प्रकाश शिंदे यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांचा कोणीतरी खून केला असावा असा संशय पोलिसांना होता़ मात्र, त्या ठिकाणी कोणताही पुरावा आढळून आलेला नव्हता़ पुरावा मिळत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते़ धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे हे खंडलाय गावात तळ ठोकून बसले होते़ तरीही माहिती मिळत नव्हती़ शेवटी शनिवारी पोलीस निरीक्षक गांगुर्डे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर या तीन संशयिताना अटक करण्यात आली़ तालुका पोलीस घटनेचा तपास करीत आहेत़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी