शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

वीज कामगारांवरील हल्ले थांबवा वर्कर्स फेडरेशन : वीजबिल वसुली कामगारांना संरक्षण देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:32 IST

धुळे : महावितरण कंपनीमध्ये राज्यात एकूण ८८ हजार ६६२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ५४ हजार ४४७ पदे भरलेली ...

धुळे : महावितरण कंपनीमध्ये राज्यात एकूण ८८ हजार ६६२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ५४ हजार ४४७ पदे भरलेली आहेत. महावितरणमध्ये हजारो पदे रिक्त असताना कर्मचारी वेळेचे बंधन न पाळता अविरत काम करत आहेत. ग्राहकांना चांगली सेवा देत वीजबिल वसुली करत आहेत. वीज ग्राहकांचे सेवक असलेले वीज कामगार आणि अभियंते यांच्यावर हल्ले करु नयेत, असे आवाहन कामगार नेते एम. जी. धिवरे यांनी केले आहे. राज्यात लाॅकडाऊन असताना कोरोनाची भीती न बाळगता रात्रं-दिवस काम करुन कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवला. अनेक वीज कामगारांना कोरोनाची लागण झाली. काही कामगारांना आपला जीवही गमवावा लागला. तरीही महावितरणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वीज ग्राहकांना चांगली सेवा देत आहेत. वीजबिल माफ करणे किंवा कमी करणे हे कामगारांच्या हातात नाही. परंतु, कोरोनाच्या काळात शासनाने वेगवेगळ्या घोषणा केल्याचा त्रास कामगारांना सहन करावा लागत आहे. कोरोना काळातील वीजबिल माफी हवी असेल तर तशी मागणी सरकारकडे करणे संयुक्तिक ठरेल. एकीकडे वीजबिल वसुलीसाठी कामगारांवर प्रशासनाचा तगादा आहे तर दुसरीकडे वीज ग्राहकांकडून कामगारांवर हल्ले होत आहेत. अशा प्रकारचे हल्ले करु नयेत, असे आवाहन वर्कर्स फेडरेशनने केले आहे. तसेच कामगार किंवा अधिकारी ग्राहकांना अपशब्द वापरत असतील तर त्यांची नावे संघटनेकडे द्यावीत, असेही स्पष्ट केले.

दरम्यान, वीज कामगारांनाही कोरोना प्रतिबंधक लस त्वरित द्यावी, यासाठी संघटना प्रशासनासोबत वेळोवेळी पत्रव्यवहार करत आहे. तरीही अजून लसीकरण सुरु झाले नाही. प्रशासनाने यात लक्ष घालावे तसेच वीजबिल वसुलीसाठी जाणाऱ्या कामगारांना संरक्षण द्यावे, अशी मागणीही एम. जी. धिवरे, नाना पाटील, विरेंद्र पाटील, विशाल पाटील, प्रकाश कोळी, व्ही. पी. सूर्यवंशी, जळगाव झोनमधील संघटनेचे पदाधिकारी दीपक सोनवणे, विनोद सोनवणे, एस. आर. पाटील, ए. टी. बागुल आदींनी केली आहे.