धुळे-चाळीसगाव रेल्वे सुरू करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना : रेल्वे प्रशासनाला दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST2021-03-13T05:05:02+5:302021-03-13T05:05:02+5:30

रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या वतीने व राज्य शासनाच्या वतीने देशातील व राज्य अंतर्गत चालणाऱ्या ...

Start Dhule-Chalisgaon Railway Maharashtra Navnirman Sena: Statement given to Railway Administration | धुळे-चाळीसगाव रेल्वे सुरू करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना : रेल्वे प्रशासनाला दिले निवेदन

धुळे-चाळीसगाव रेल्वे सुरू करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना : रेल्वे प्रशासनाला दिले निवेदन

रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या वतीने व राज्य शासनाच्या वतीने देशातील व राज्य अंतर्गत चालणाऱ्या अनेक रेल्वे या पूर्ववत सुरू करण्यात आलेल्या आहेत. असे असताना ब्रिटिश काळापासून सुरू असलेले धुळे ते चाळीसगाव, चाळीसगाव ते धुळे डेमो रेल्वे गेल्या अकरा महिन्यांपासून बंद आहे. यामुळे अनेक नोकरदार वर्ग, व्यावसायिक, कामगार आणि मजूर यांची गैरसोय होत आहे. त्यांना प्रवासाची महागडी साधने वापरावी लागत आहेत. रेल्वे ही सर्वांना परवडणारी, सर्वसामान्यांच्या सोयीची आहे. असे असताना धुळे ते चाळीसगाव व चाळीसगाव ते धुळे रेल्वे पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे. वरील सर्व गोष्टींचा आपण गांभीर्याने विचार करावा आणि वरिष्ठ स्तरावर यासाठी पाठपुरावा करावा. निवेदनानंतर पुढील पंधरा दिवसात याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना चाळीसगाव पॅसेंजरला दे धक्का दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.

निवेदन देताना मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंत देशमुख, जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत, संदीप जडे, संतोष मिस्तरी, अनिल शिरसाठ, नीलेश गुरव, राजेश दुसाने, दीपक पाटील, विकास पाटील, रोहित नेरकर, अविनाश देवरे, बापू ठाकूर, अक्षय शिंदे, हरीश जगताप आदी उपस्थित होते.

Web Title: Start Dhule-Chalisgaon Railway Maharashtra Navnirman Sena: Statement given to Railway Administration