शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाण्यांचा भाव वाढण्याची शक्यता : कृषी अधिकारी : घरचे बियाणे वापरण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST

जिल्ह्यात मागील हंगामात सोयाबीन पीक काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन बियाणे भिजलेले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याच्या उगवण ...

जिल्ह्यात मागील हंगामात सोयाबीन पीक काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन बियाणे भिजलेले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधी बियाण्याची घरच्या घरी उगवण क्षमता तपासणी करून घ्यावी. बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के असेल, तर पेरणी करावी. ज्या प्रमाणात बियाणाची उगवण क्षमता येईल त्या प्रमाणात पेरणीसाठी बियाण्याचा प्रती हेक्टर वापर करणे योग्य ठरेल. सोयाबीन हे स्वयंपराग सिंचित व सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या स्व:उत्पादित बियाण्याची उगवण क्षमता तपासून वापर करावा.

तसेच सध्या बाजारात सोयाबीनचा भाव वधारला असल्याने बियाणे कंपन्या देखील सोयाबीन बियाण्याचे दर मागील वर्षापेक्षा जास्त दराने आकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीन बाजारात न विकता येत्या खरीप हंगामासाठी राखून ठेवावे. स्वत:ची गरज भागवून देखील बियाणे शिल्लक राहत असेल, तर शिल्लक बियाणे आपल्या मित्रमंडळी, नातेवाइकांना पेरणीसाठी दिल्यास घेणाऱ्या व देणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल. शेतकऱ्यांनी वाळलेल्या बियाण्यातील शेंगा, फोलपटे, काडीकचरा, माती, खडे काढून स्वच्छ करावे.

स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या, नवीन पोत्यात साठवून ठेवावे. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते. त्यामुळे साठवणुकीचे ठिकाण थंड किंवा ओलावाविरहित व हवेशीर असले पाहिजे याची काळजी घ्यावी. साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवताना पोत्यांची थप्पी सात फुटांपेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता घ्यावी. बियाणे १०० किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना चार पोत्यांमध्ये जास्त व ४० किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास आठ पोत्यांपेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये, अन्यथा सर्वांत खालच्या पोत्यातील बियाण्यांवर जास्त वजन पडून बियाण्याची उगवण शक्ती कमी होते. पोत्यांची रचना उभ्या-आडव्या पद्धतीने करावी, म्हणजे हवा खेळती राहून बियाण्यांची गुणवत्ता व उगवण शक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होते. आवश्यकतेनुसार बियाणे साठवणूक केलेल्या खोलीमध्ये कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर करावा. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहायकास किंवा कृषी कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.