दोन जीवलग मित्रांची एकाचवेळी अंत्ययात्रा

By Admin | Updated: April 30, 2017 12:07 IST2017-04-30T12:07:18+5:302017-04-30T12:07:18+5:30

कुसुंबा शोकसागरात बुडाले : शिंदे, चौधरी यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

Simultaneous endowments of two best friends | दोन जीवलग मित्रांची एकाचवेळी अंत्ययात्रा

दोन जीवलग मित्रांची एकाचवेळी अंत्ययात्रा

 कुसुंबा,जि.धुळे, दि.30 - पोहण्यासाठी गेलेल्या दोन जीवलग मित्रांचा शनिवारी विहिरीत बुडून मृत्यू झाला. त्यानंतर या दोन्ही मित्रांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी नऊ वाजता कुसुंबा गावातून एकाच वेळी निघाली. यावेळी संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते.  शिंदे व चौधरी कुटुंबातील एकुलत्या एक मुलांचा अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

कुसुंबा गावातील पांझरा नदी पात्रात मेहेरगावाला पाणी पुरवठा करणा:या विहिरीत शनिवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेले  कुसुंबा येथील धर्मराज सुरेश शिंदे (21,गल्ली क्रमांक 3) व कमलेश पंडीत चौधरी (22, कुंभारवाडा) या तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. शनिवारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. आपत्कालीन विभागाच्या पथकाला या तरुणांचा मृतदेह सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हाती लागला होता. त्यानंतर या तरुणांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला होता. 
कुसंब्याकडून कावठेकडे जाताना येणा:या पांझरा नदीच्या पात्रानजीक असलेल्या अमरधाममध्ये तरुणांवर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मराज शिंदे याच्या पश्चात आई-वडील, एक बहिण असा परिवार आह़े वडील आदिवासी महामंडळात कार्यरत आहेत़ आई घरकाम आणि शिवणकाम करते; तर कमलेश चौधरी याच्या पश्चात  आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आह़े 

Web Title: Simultaneous endowments of two best friends