शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार निवारण केंद्राचे शटर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:37 IST

शहरातील नंदनवन बँक कॅालनी परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. नागरिकांनी रात्रीच क्रीडा संकुल येथे असलेल्या पंचवटी ग्राहक तक्रार ...

शहरातील नंदनवन बँक कॅालनी परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. नागरिकांनी रात्रीच क्रीडा संकुल येथे असलेल्या पंचवटी ग्राहक तक्रार निवारण केंद्रावर तक्रार नोंदविण्यासाठी वारंवार फोन केला; मात्र या क्रमांकावरून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. या कॅालनी परिसरात कोराेना पॅाझिटिव्ह असलेल्या काही रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत; मात्र वीज पुरवठा नसल्याने, अनेकांना श्वास घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. लहान मुले रात्रभर झोपू शकली नाहीत.

दरम्यान काहींनी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर पहाटे तीन वाजता तक्रार नोंदवली; मात्र त्याची दखल सकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात आली नाही. अखेर या भागातील काही नागरिक सकाळी ५ वाजता २४ तास अत्यावश्यक सेवा देणाऱ्या तक्रार निवारण केंद्रावर गेले असता, ते बंदच होते. सकाळी सात वाजता या कार्यालयाचे प्रमुख असलेल्या भामरे यांच्या भ्रमणध्वनीवर तक्रार करूनही त्याची दखल घेतली नाही. काही जण पुन्हा या कार्यालयात गेले. बंद अवस्थेत असलेल्या शटरला कुलूप नसल्याने, काहींनी शटर उघडून पाहिले असता, तेथे कोणीही आढळून आले नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर पंचवटी ग्राहक तक्रार निवारण केंद्राच्या शेजारीच तुळशीराम नगर ग्राहक तक्रार निवारण केंद्र आहे. ते सुद्धा बंद होते.

अखेर तब्बल आठ तासानंतर या भागात वीज पुरवठा सुरू झाला. तक्रार निवारण केंद्राद्वारे वेळीच तक्रार घेतली असती तर नागरिकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.