शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
5
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
6
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
7
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
8
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
9
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
10
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
11
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
12
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
13
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
14
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
15
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
16
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
17
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
18
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
19
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
Daily Top 2Weekly Top 5

शिरुडला तरुणीची विहिरीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 22:12 IST

अकस्मात मृत्यूची नोंद : गावात हळहळ

धुळे : रात्रीच्या अंधारात विहिरीत उडी घेऊन तरुणीने आपले जीवन संपविले असल्याची घटना धुळे तालुक्यातील शिरुड गावात घडली़ हा प्रकार शुक्रवारी सकाळी उजेडात आला़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़धुळे तालुक्यातील शिरुड येथील कालिकामाता मंदिराजवळ राहणाऱ्या गणेश भारत पारधी (२४) या तरुणाने फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, गणेश याची चुलत बहिण वंदना साहेबराव पारधी (२१) ही शुक्रवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास आपल्या घरात झोपलेली होती़ त्यानंतर ती घरातील मंडळींच्या नजरा चुकवून घरातून गुपचूप निघून गेली़ सकाळी उठल्यानंतर ती घरात दिसून आली नाही़ तिची सर्वत्र शोधाशोध सुरु करण्यात आली़ तिच्या संदर्भातील चौकशी मैत्रिणी, नातेवाईकांकडे करण्यात आली़ पण, ती मिळून आली नाही़तिची शोधाशोध सुरु असताना सकाळी ६ वाजेच्या सुमारास गावातीलच सुरेखाबाई पारधी या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या़ त्यावेळी त्यांना वंदना ही विहिरीतील पाण्यात तरंगतांना आढळून आली़ यानंतर तिचा मृतदेह विहिरीतून काढण्यासाठी धावाधाव सुरु झाली़ गावातीलच समाधान पारधी, दादा पारधी, अनिल पारधी यांनी वंदना हिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला़ त्यानंतर तिला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ डॉ़ पुर्वा पाटील यांनी तपासून वंदना हिला मृत घोषीत केले़दरम्यान, वंदना हिचे लग्न ठरले होते़ परंतु वंदना हिच्या पाठीवर पांढरे कोड असल्याने तिचे लग्न मोडले होते़ परिणामी ती तणावात होती़ त्यातून तिने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे