शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

शिवणयंत्र व्यवसायाला अत्यावश्यक सुविधेचा दर्जा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:34 IST

धुळे : कोरोना महामारीच्या संकटात शिवणयंत्र विक्री आणि दुरुस्ती या व्यवसायाला अत्यावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा, अशी ...

धुळे : कोरोना महामारीच्या संकटात शिवणयंत्र विक्री आणि दुरुस्ती या व्यवसायाला अत्यावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा, अशी मागणी धुळ्यातील शिवणयंत्र व्यावसायिकांनी शासन-प्रशासनाकडे केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आदींना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, खाद्यपदार्थ, तेल, पशुखाद्य, दवाखाने, औषधालये आदी अत्यावश्यक वस्तूंच्या व्यवसायात शिवण यंत्राची भूमिका महत्त्वाची असते. कोरोनाशी लढण्याचे महत्त्वाचे हत्यार मास्क तयार करण्यासाठी शिवणयंत्राची आवश्यकता असते.

रुग्णालयातील चादर, रुग्णांचे कपडे, डाॅक्टरांचे कपडे, सर्जिकल गाऊन, स्क्रब तयार करण्यासाठीदेखील शिवणयंत्र लागते. या वस्तूंचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा झाला नाही तर रुग्णालयांमध्ये असुविधा होऊ शकते. त्यामुळे शिवण यंत्राला अत्यावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक व्यवसायाचा दर्जा द्यावा, अशी मागणी आहे.

रब्बी हंगामाची पिके आता काढली जात आहेत, तर काहींनी काढली आहेत. धान्य साठविण्यासाठी गोण्यांचा वापर केला जातो. बॅग क्लोझर शिवण यंत्राच्या साहाय्याने गोण्या पॅक करून बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. तेल उत्पादक तसेच पशुखाद्य कंपन्यांनादेखील शिवणयंत्रे पॅकिंगसाठी आवश्यक असतात.

या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा होऊ नये, पुरवठा सुरक्षित आणि नियमित व्हावा यासाठी शिवण यंत्रांची विक्री आणि दुरुस्ती व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा, अशी मागणी शिवणयंत्र विक्रेते आणि दुरुस्ती कामगारांनी केली आहे.