तऱ्हाडी उपसरपंचपदी उजनबाई अहिरे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST2021-03-17T04:36:29+5:302021-03-17T04:36:29+5:30

तऱ्हाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाचा गणेश नथा भामरे यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त होते . १५ रोजी सकाळी अकरा वाजता ...

Selection of Ujanbai Ahire as Tarhadi Deputy Panch | तऱ्हाडी उपसरपंचपदी उजनबाई अहिरे यांची निवड

तऱ्हाडी उपसरपंचपदी उजनबाई अहिरे यांची निवड

तऱ्हाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाचा गणेश नथा भामरे यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त होते . १५ रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामविकास अधिकारी जी. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. उपसरपंच पदासाठी प्रफुल साहेबराव पाटील व उजनबाई अहिरे यांनी अर्ज दाखल केले. यात दोघांना सात - सात मते मिळाली. त्यावेळी विद्यमान सरपंच जयश्री धनगर यांच्या निर्णायक मताने उजनबाई वासुदेव अहिरे यांना आठ मते व प्रफुल्ल पाटील यांना सात मते पडली. म्हणून उजनबाई वासुदेव अहिरे यांची उपसरपंचपदावर निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित उपसरपंच उजनबाई वासुदेव अहिरे यांच्या निवडीबद्दल माजी सरपंच सुदाम भलकार, माजी उपसरपंच अशोक सोनवणे, सुनील धनगर, रावसाहेब कदम, ज्ञानेश्वर भामरे, रावसाहेब बोरसे, रवींद्र अहिरे व रावसाहेब अहिरे आदींनी स्वागत केले.

Web Title: Selection of Ujanbai Ahire as Tarhadi Deputy Panch