तीळ, सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची निवड महाडीबीटीद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:38 AM2021-05-11T04:38:26+5:302021-05-11T04:38:26+5:30

धुळे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत (गळीत धान्य) सोयाबीन, तीळ पिकांच्या नवीन वाणांचे प्रमाणित बियाणे अनुदान तत्त्वावर शेतकऱ्यांना ...

Selection of farmers for sesame, soybean seeds by MahaDBT | तीळ, सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची निवड महाडीबीटीद्वारे

तीळ, सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची निवड महाडीबीटीद्वारे

Next

धुळे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत (गळीत धान्य) सोयाबीन, तीळ पिकांच्या नवीन वाणांचे प्रमाणित बियाणे अनुदान तत्त्वावर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. सन २०२१-२२ पासून बियाणे वितरणासाठी लाभार्थी निवड महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी विकसित केलेल्या संकेतस्थळावर बियाणे वितरण या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली.

यंदाच्या खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरणासाठी सममर्यादित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी १५ मेपर्यंत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. यासाठी प्रति लाभार्थी कमाल २ हेक्टरपर्यंत लाभ देता येणार आहे.

पीकनिहाय विहित वयोमर्यादा व अनुदानाचे दर असे : सोयाबीन, मागील १५ वर्षांआतील (सन २०११ व तदनंतर) अधिसूचित वाण, अनुदानाचा दर किमतीच्या ५० टक्के किंवा १२०० रुपये प्रति क्विंटलपैकी किमानप्रामणे. तीळ, मागील १५ वर्षांआतील (सन २०११ व तदनंतर अधिसूचित वाण), किमतीच्या ५० टक्के किंवा ८ हजार रुपये प्रति क्विंटलपैकी किमानप्रमाणे.

प्राप्त अर्जाचा विचार करून सोडत काढून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. निवडलेल्या लाभार्थ्यांना बियाणे वितरणाची कार्यपद्धती शासकीय बियाणे पुरवठादार संस्था यांच्या समन्वयाने अंतिम करून त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी दिली.

Web Title: Selection of farmers for sesame, soybean seeds by MahaDBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.