शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती प्रकल्पाची सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:52 IST

मालपूर : विद्युत खोलीचा दरवाजा, खिडक्या तुटल्या, सुरक्षा रक्षक नसल्याने चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प सुरक्षा रक्षकांअभावी रामभरोसे असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रकल्पातील विद्युत खोलीचा दरवाजा, खिडक्या तुटल्या आहेत. पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे नुकसान होत आहे.मालपूर येथे अमरावती मध्यम प्रकल्प असून १४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर यावर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पाला डावा व उजवा असे दोन कालवे आहेत. १० वक्राकार दरवाजाचा अमरावती नदी पात्रात मुख्य सांडवा आहे. स्वतंत्र विद्युत रोहित्र असून त्या खोलीचे दरवाजे, खिडक्या मोडकळीस आलेल्या आहेत. प्रकल्पाची देखभाल करण्यासाठी येथे सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे. मात्र, येथे सुरक्षा रक्षक नसल्याने सुरक्षाच वाऱ्यावर आहे. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.अमरावती धरणाच्या आतील व बाहेरील बांधावर मोठमोठे काटेरी वृक्ष वाढले असून यामुळे या बांधाला धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय या बांधावर मध्यभागी मोठमोठे तडे गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व काटेरी वृक्ष काढून पडलेले तडे दुरुस्त करणे गरजेचे आहे. तसेच या प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांच्या मुख्य विमोचकांना मोठी गळती दिसून येत आहे. या विमोचकांच्या पक्क्या बांधकामाच्या भिंतीमधून पाणी निघतांना दिसून येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. हे पाणी वाचविणे गरजेचे आहे. मागीलवर्षी याच दिवसात मालपूर ग्रामस्थांनी कधी नव्हे एवढी पाणीटंचाई सोसली आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व कळाले आहे. मात्र, पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे.१४ वर्षांपासून या प्रकल्पात ठणठणाट असल्यामुळे डावा व उजव्या कालव्याच्या पोटचाºया अस्तित्वातच राहिलेल्या नाहीत. त्या पोटचाºया पाटबंधारे विभागामार्फत पुन्हा करण्यात याव्या, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे