शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

त्या सोसायटीचे दोन गाळे सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 22:35 IST

१० कोटींवर घोटाळा : फरार दोन संशयितांचा शोध सुरु

धुळे : वेगवेगळे आमिष दाखवत ठेवीदारांची १० कोटी २९ लाखांवर फसवणूक करणाऱ्यांपैकी दोघांनी शिवतिर्थ चौकातील नहार कॉम्प्लेक्समध्ये दोन गाळे घेतल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळताच धाड टाकण्यात आली़ ही दोन्ही गाळे सील करण्यात आले़धुळे तालुक्यातील शिरुड येथे उज्ज्वलम अ‍ॅग्रो मल्टीस्टेट को आॅपरेटीव्ह सोसायटी प्रा़ लि़ नाशिक आणि माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को आॅपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड कार्यालय स्थापन करण्यात आले होते़ या ठिकाणी आॅक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१९ या कालावधीत १ हजार ४६१ ठेवीदारांनी आपल्या वेगवेगळ्या रक्कमेची गुंतवणूक या सोसायटीत केली होती़ त्यांना आकर्षक व्याजदर, विविध प्रेक्षणीय स्थळी सहल यासह सोने-चांदी देण्याचे आमिष दाखविण्यात आले़ को आॅपरेटीव्ह सोसायटीचे स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडून प्रसार करण्यात आला़ ठेवीदारांकडून रोखीने ठेवी स्विकारण्यात आल्या़ पाठपुरावा करुनही त्याचा उपयोग होत नव्हता़ कार्यालय बंद करुन पसार झाल्याने संशय बळावला होता़ शिवतिर्थ चौकात नहार कॉम्प्लेक्समध्ये असलेले १३ आणि १४ नंबरचे दोन गाळेतून व्यवहार सुरु होता अशी गोपनीय माहिती याप्रकरणाचे तपासी अधिकारी तथा सपोनि हेमंत बेंडाळे यांना मिळाली़ माहिती मिळताच या गाळ्यांवर गुरुवारी दुपारी धाड टाकण्यात आली आणि हे दोन्ही गाळे सील केले़ भैय्यासाहेब यशवंत गुजेला (धुळे), भैय्या दिलीप अहिरे (धुळे) या दोघा संशयितांनी या गाळेमध्ये कार्यालय सुरु करुन ठेवीदारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ हे दोघे आता फरार असून त्यांच्या मागावर पोलीस आहेत़ पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, एलसीबी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत बेंडाळे व पथकातील भूषण जगताप, रविंद्र शिंपी, मनोज बाविस्कर, नितीन चव्हाण, सुरेश पाटील यांनी ही कारवाई केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे