धुळे शहरात वाळू उपसा जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:34 IST2021-03-24T04:34:00+5:302021-03-24T04:34:00+5:30

पाणीटंचाईच्या झळा धुळे : उन्हाळा लागून महिना झाला नाही तोच ग्रामीण भागात काही गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ...

Sand dredging is rampant in Dhule city | धुळे शहरात वाळू उपसा जोरात

धुळे शहरात वाळू उपसा जोरात

पाणीटंचाईच्या झळा

धुळे : उन्हाळा लागून महिना झाला नाही तोच ग्रामीण भागात काही गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अजुन पाणीटंचाई नसली तरी नियोजन म्हणून विलंबाने पाणीपुरवठा होत आहे. नियोजनाची गरज आहे.

रहदारीला अडथळा

धुळे : देवूरात दत्त मंदिर चाैकापासून ते जीटीपी चाैकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला विक्रेत्यांसह इतर व्यावसायिक बसलेले असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. हाॅकर्स झोन तयार करणे गरजेचे आहे.

गटारी तुंबल्या

धुळे : साक्री रोडवरील मोगलाई परीसरात गटारींची नियमीत स्वच्छता होत नसल्याने काही भागात गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. गटारी नियमीत काढण्याची मागणी आहे.

विजेची उधळपट्टी

धुळे : शहरात काही भागांमध्ये दिवसा देखील पथदिवे सुरु असतात. त्यामुळे विजेची उधळपट्टी होत आहे. तर दुसरीकडे शहरातील काही भागांमध्ये रात्रीच्या वेळेला पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य असते.

Web Title: Sand dredging is rampant in Dhule city