शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

घरांवर खारी माती, कागद टाकण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:34 IST

कापडणे : या वर्षी वेळेवर मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने, कापडणे गावासह परिसरातील नागरिकांनी आपापल्या कच्च्या ...

कापडणे : या वर्षी वेळेवर मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने, कापडणे गावासह परिसरातील नागरिकांनी आपापल्या कच्च्या मातीच्या धाब्याची डागडुजी करून धाब्यावर प्लास्टीक कागद अंथरून नवीन खारी माती टाकून धाब्याची दुरुस्ती केली जात आहे.

पावसाळा वेळेवर सुरू होण्याच्या अपेक्षेने शेतकरी आपल्या शेतीची कामे उरकण्यासोबत कच्च्या मातीच्या धाब्यांवर प्लास्टीक कागद-खारी माती टाकून पावसाच्या पाण्याने धाब्याची गळती लागू नये, यासाठी प्रयत्नशील आहेत.

खारी मातीला प्लास्टीक कागद पर्याय

सात-आठ वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या धाब्यावर खारी माती/चिवट माती लांब अंतरावरून बैलगाडी अथवा ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने मोठ्या कसरतीने आणावी लागत होती, परंतु वर्षानुवर्षे खारी मातीचे उत्खनन होत असल्याने आता चांगल्या दर्जाची, पाण्याची गळती रोखणारी खारी माती उपलब्ध होत नाही. याला पर्याय म्हणून प्लास्टीकचा कागद धाब्यावरती टाकला जात आहे. कमी खर्चात कमी श्रमात प्लास्टीकचा कागद टाकून पावसाच्या पाण्याची गळती थांबविली जाते. म्हणून काही जण खारी माती, तर काही जण प्लास्टीक कागद टाकतात, तर काही जण प्लास्टीक कागद टाकून त्यावरती नवीन खारी माती देखील टाकत असतात. मात्र, आता ग्रामीण भागातही काँक्रिटच्या घरांची संख्या वाढू लागली असून, मातीच्या घरांची संख्या कमी होऊ लागलेली आहे. ज्याची मातीची घरे आहेत, ते पावसाळ्यापासून बचावासाठी खारी माती टाकीत असतात.

३०० रुपयांत एक बैलगाडी खारी माती

गेल्या काही वर्षांपासून बहुतांश शेतकऱ्यांकडे आता बैलजोडी नसल्याने ट्रॅक्‍टरच्या साह्याने आता खारी माती आणली जात असते. मालदार शेतकऱ्यांच्या अतिमोठ्या घरांच्या धाब्यावर तीन हजार रुपये ट्रॉलीप्रमाणे खारी माती विकत घेतली जात आहे, तर लहान घरांचे घर मालक ट्रॅक्टरवाल्यांकडून तीनशे रुपये प्रतिबैलगाडी खारी माती विकत घेत आहेत. सध्या येथील ट्रॅक्टरधारकांना खारी माती आणण्यात रोजगार उपलब्ध होत आहे. खारी मातीसोबतच प्लास्टीकचा कागद पन्नास रुपये मीटरपासून तर १२० रुपये मीटरपर्यंत बाजारातून विकत घेतला जात आहे.