शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

घरांवर खारी माती, कागद टाकण्याची लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST

पावसाळा वेळेवर सुरू होण्याच्या अपेक्षेने शेतकरी आपल्या शेतीची कामे उरकण्यासोबत कच्च्या मातीच्या धाब्यांवर प्लास्टिक कागद - खारी माती ...

पावसाळा वेळेवर सुरू होण्याच्या अपेक्षेने शेतकरी आपल्या शेतीची कामे उरकण्यासोबत कच्च्या मातीच्या धाब्यांवर प्लास्टिक कागद - खारी माती टाकून पावसाच्या पाण्याने धाब्याची गळती लागू नये यासाठी प्रयत्नशील आहेत.

खारी मातीला प्लास्टिक कागद पर्याय

सात- आठ वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या धाब्यावर खारी माती/चिवट माती लांब अंतरावरून बैलगाडी अथवा ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने मोठ्या कसरतीने आणावी लागत होती; परंतु वर्षानुवर्षे खारी मातीचे उत्खनन होत असल्याने आता चांगल्या दर्जाची, पाण्याची गळती रोखणारी खारी माती उपलब्ध होत नाही. याला पर्याय म्हणून प्लास्टिकचा कागद धाब्यावरती टाकला जात आहे. कमी खर्चात कमी श्रमात प्लास्टिकचा कागद टाकून पावसाच्या पाण्याची गळती थांबवली जाते. म्हणून काहीजण खारी माती, तर काहीजण प्लास्टिक कागद टाकतात तर काहीजण प्लास्टिक कागद टाकून त्यावरती नवीन खारी माती देखील टाकत असतात

तीनशे रुपयांत एक बैलगाडीभर खारी माती

गेल्या काही वर्षांपासून बहुतांश शेतकऱ्यांकडे आता बैलजोडी नसल्याने ट्रॅक्‍टरच्या साह्याने आता खारी माती आणली जात असते. मालदार शेतकऱ्यांच्या अतिमोठ्या घरांच्या धाब्यावर तीन हजार रुपये ट्रॉलीप्रमाणे खारी माती विकत घेतली जात आहे, तर लहान घरांचे घर मालक ट्रॅक्टरवाल्यांकडून तीनशे रुपये प्रतिबैलगाडी खारी माती विकत घेत आहेत. सध्या येथील ट्रॅक्टरधारकांना खारी माती आणण्यात रोजगार उपलब्ध होत आहे. खारी मातीसोबतच प्लास्टिकचा कागद पन्नास रुपये मीटरपासून तर १२० रुपये मीटरपर्यंत बाजारातून विकत घेतला जात आहे.