संत समागमाचे रविवारी पिंपळनेर येथे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 22:43 IST2019-12-20T22:42:46+5:302019-12-20T22:43:22+5:30

खान्देशस्तरीय : भाविकांची राहणार उपस्थिती

Saints gathering on Sunday in Pimpalner | संत समागमाचे रविवारी पिंपळनेर येथे आयोजन

संत समागमाचे रविवारी पिंपळनेर येथे आयोजन

पिंपळनेर : येथील संत निरंकारी मंडळाच्या धुळे झोन मधील पिंपळनेर शाखेत रविवार २२ डिसेंबर रोजी खान्देशस्तरीय ४० व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे (संमेलन) आयोजन करण्यात आले आहे.
येथील राजे छत्रपती इंग्लिश मेडीयम स्कुलशेजारच्या मैदानावर रविवारी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत निरंकारी मंडळाचे समिती सदस्य प. पू. ब्रजमोहनसिंहजी सेठी यांच्या पावन सान्निध्यात सत्संग, प्रवचन, ज्ञानदान व महाप्रसादाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खान्देशातील धुळे, नंदुरबार, जळगावासह नाशिक, मालेगाव, औरंगाबाद व लगतच्या गुजरात, मध्यप्रदेशातील १० ते १५ हजार भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती धुळे झोनचे झोनल प्रमुख हिरालाल जी़ पाटील, पिंपळनेर शाखेचे मुखी व ज्ञानप्रचारक जगदीश ओझरकर यांनी दिली.
पिंपळनेर येथे होणाऱ्या या संत समागमाचे ४० वे वर्ष असून खान्देशात प्रत्येक गाव -शहरांमध्ये असंख्य भक्त -समुदाय आध्यात्मिक जागृतीचे कार्य करीत आहे. रविवारी होणाºया या सत्संग-प्रवचनाच्या तयारीसाठी गेल्या आठवड्यापासून पंचक्रोशीतील सर्व भाविक सेवा कार्य करीत असून युद्धपातळीवर कार्यक्रमाची तयारी सुरु आहे़ भाविक मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत़

Web Title: Saints gathering on Sunday in Pimpalner

टॅग्स :Dhuleधुळे