शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

संत सेनानगरात बंद घर चोरट्याने फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 22:06 IST

साडेतीन लाखांचा ऐवज : पोलिसात गुन्हा नोंद

धुळे : देवपुरातील संत सेनानगरमध्ये राहणारे कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्याने घरातील किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतून साडेतीन लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ चोरीच्या या घटनेमुळे संत सेनानगरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ देवपुरातील संत सेनानगरात राहणारे सागर निलेश बडगुजर (२४) या घरमालकाने देवपूर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, बडगुजर यांच्या घरातील सर्व सदस्य नातलगांकडे वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमासाठी शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे १० आॅक्टोबर रोजी गेले होते़ बंद घर असल्याची संधी साधून चोरट्याने घराच्या किचनच्या   बाजुकडील दरवाजा तोडला़ घरात प्रवेश करुन घरातील संसारोपयोगी साहित्याची नासधूस केली़ कपाटातील सामान अस्ताव्यस्त करुन टाकला़ कपाटात ठेवण्यात आलेले १८१ ग्रॅम सोन्याचे दागिने, १३ भार चांदी, रोख ५ हजाराची रक्कम असा एकूण ३ लाख ४९ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे़ बडगुजर कुटुंब १२ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांना आपल्या घराचा दरवाजा उघडा दिसला़ आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब देवपूर पोलिसांना कळविली़ घटनास्थळी पोलीस येऊन त्यांनी पाहणी केली आणि घटनेचा पंचनामा केला़ याप्रकरणी सागर बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार घटनेचा तपास करीत आहेत़ घटनेची चर्चा परिसरात सुरु आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस