शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल, खतांच्या किमतीत वाढ, मात्र पिकाचे भाव कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:37 IST

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात पेट्रोल, डिझेल, रासायनिक तसेच शेण खतांच्या किमतीत दरवर्षी प्रचंड वेगाने वाढ होत असल्याचे ...

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात पेट्रोल, डिझेल, रासायनिक तसेच शेण खतांच्या किमतीत दरवर्षी प्रचंड वेगाने वाढ होत असल्याचे दिसून येते. मात्र, त्या तुलनेत शेतपिकांच्या उत्पादनात वाढ न होता घट दिसून येते.

सध्या तर लाॅकडाऊनच्या नावाखाली शेतकरी नाडला जात आहे. आगामी खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामांसाठी पैसा हातात नसल्यामुळे व्यापारी मागेल त्या भावात शेती उत्पादन द्यावे लागत आहे. यामुळे या पिकांना लागलेला खर्चदेखील निघत नसल्याने बिकट परिस्थिती सध्या मालपूरसह परिसरात झाली आहे.

डिझेलचे दर वाढल्यामुळे शेती मशागतीची कामे करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांनी दर वाढवले. मात्र, शेतपिकांचे भाव गडगडल्याने यामध्ये अडचण निर्माण झाली. रासायनिक खतांच्या किमतीतही यावर्षी वाढ दिसून येत आहे. काहींनी आवश्यकता होती म्हणून लिंक पध्दतीने खते खरेदी करून पीक वाढीस लावले होते. तसेच या खतांबरोबर शेणखतदेखील आवश्यक असते. आधीच गुरांची संख्या कमी झाल्यामुळे शेणखतांच्या किमतीदेखील नुसत्या वाढल्या नसून गगनाला भिडल्या आहेत. यामुळे शेती करावी का पडून राहु द्यावी, असा येथील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.