शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटिंग फेडरेशनमध्ये हेराफेरी, शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 22:38 IST

शेतकऱ्यांची तक्रार : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नावनोंदणी सुरळीत

धुळे : येथील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात हमीभावाने शेतीमाल खरेदीसाठी नावनोंदणीत हेराफेरी होत असल्याचा आणि शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांची मागच्या दाराने नावनोंदणी केली जात असल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत तक्रारी केल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नावनोंदणीची प्रक्रिया सुरळीत झाली. धुळे शहरात विधी महाविद्यालयाजवळ असलेल्या धुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात हमीभावाने धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची नावनोंदणी सुरु झाली आहे. यासाठी धुळे तालुक्यातील बोरकुंड, हडसुणे, कुसुंबा, दोंदवाड, विंचूर, वडगाव, विसरणे यांसह अनेक गावातील शेतकरी मका, ज्वारी आदी धान्य विक्रीसाठी गेल्या आठवड्यापासून कार्यालयात खेटा घालत होते. परंतु ऑनलाईन नोंदणी असल्याने आणि सर्वर चालत नसल्याने सोमवारी नावनोंदणी करण्यात येईल, असे संबंधित कार्यालयाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासूनच नावनोंदणीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. परंतु शेतकऱ्यांची नोंदणी सुरु होण्याआधीच ७० ते ८० जणांची नोंदणी झाल्याचे या शेतकऱ्यांना समजले. शुक्रवारपासून चकरा मारणारे शेतकरी सकाळपासून रांगेत उभे असताना त्यांच्यापुढे अचानक इतके नंबर लागले कसे, असा प्रश्न उपस्थित केला. परंतु फेडरेशनच्या कार्यालयातील कर्मचारी दाद देत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आपली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना तोंडी सांगितली. त्यानुसार जिल्हाधिकारी संजय यादव यांनी फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी सोनवणे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेतले आणि नव्याने शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची आदेश दिले. त्यानुसार नावनोंदणीची प्रक्रिया सुरळीत सुरु झाली असून, शेतकऱ्यांची नावनोंदणी करुन त्यांना टोकन देण्यात येत आहे.याबाबत वडगावचे शेतकरी रघुनाथ पाटील यांनी सांगितले की, हमीभावाने शेतीमाल खरेदीसाठी वशिलेबाजी चालते. पुढाऱ्यांनी सुचविलेली नावे आधी घेतली जातात. तसेच काही व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांचे सातबारा उतारे असतात. हे व्यापारी फेडरेशनच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करुन आधीच नंबर लावून घेतात. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हमीभावापासून वंचित राहू शकतात. याबाबत विचारणा केली असता तुम्ही कुठेही तक्रार केली तरी काही होणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.जिल्हाधिकारी कार्यालयात माधवराव चैत्राम पाटील, युवराज नामदेव पाटील, योगेश्वर युवराज पाटील, शांतीलाल आनंदा चाैधरी, सीताराम बापू पाटील, संदीप रामराव पाटील, पुंजू मुकुंदा पाटील, रंगराव गोरख देसले यांच्यासह २० ते ३० शेतकरी उपस्थित होते. त्यांचा प्रश्न सुटल्याने दिलासा मिळाला.

टॅग्स :Dhuleधुळे