शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाळू चोरांविरुध्द ‘महसलू’चे धाडसत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 22:05 IST

धुळे : पांझरा नदीच्या पात्रातील वाळू चोरुन अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात महसूल विभागाने धुळे तालुक्यात धाडसत्र सुरू ...

धुळे : पांझरा नदीच्या पात्रातील वाळू चोरुन अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांच्या विरोधात महसूल विभागाने धुळे तालुक्यात धाडसत्र सुरू केले आहे. धुळे ग्रामीणच्या तहसिलदार गायत्री सैंदाणे, शहराचे तहसिलदार संजय शिंदे, परिविक्षाधिन तहसिलदार तथा निवासी नायब तहसिलदार प्रथमेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू आहे.धुळे ग्रामीण तहसिल कार्यालयाच्या पथकाने गेल्या चार दिवसात पाच ट्रॅक्टर आणि एक डंपर जप्त केला आहे. त्यांच्याकडून सुमारे पावणेआठ लाख रुपयांचा दंड वसुल केला जाणार आहे. मंडळ अधिकारी पारधी, नेमाणे, सोनवणे, तलाठी पिंजारी, गजभिये, महिला तलाठी काळे यांच्या पथकाने वरखेडी कुंडाणे ता. धुळे शिवारात दोन ट्रॅक्टर पकडले. तसेच मंडळ अधिकारी सी. व्ही. पाटील, व्ही. बी. पाटील, तलाठी बांगर, बाविस्कर, आशा कुंभार यांच्या पथकाने आनंदखेडे ता. धुळे शिवारात वाळूचा एक डंपर पकडला आहे. त्यानंतर मंडळ अधिकारी देवरे, कुमावत, कांबळे, तलाठी भैरट, महेंद्र पाटील, अहिरराव यांच्या पथकाने नेर आैटपोस्ट येथे वाळूचे तीन ट्रॅक्टर पकडले. पाच ट्रॅक्टरला प्रत्येक सव्वा लाख याप्रमाणे ६ लाख २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे तर डंपरला दीड लाखांचा दंड केला आहे, अशी माहिती परिविक्षाधिन तहसिलदार प्रथमेश घोलप यांनी दिली.धुळे शहर तहसिल कार्यालयाच्या पथकाने आठवडाभरात तीन ट्रॅक्टर पकडले असून त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच तहसिलदार संजय शिंदे, लिपिक चंद्रकांत इथापे, मोराणे कोतवाल शिवलाल यांच्या पथकाने गुरूवारी साक्री रोडवर एका खाजगी हाॅटेलजवळ वाळुचे आणखी एक ट्रॅक्टर पकडले. त्याला १ लाख ८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.धुळे शहराचे तहसिलदार संजय शिंदे यांनी सांगितले की, गाैण खनिजाची चोरी आणि अवैध वाहतूक रोखण्यासाठी पथके तयार करण्याच्या सूचना वरीष्ठांनी दिल्या होत्या. त्यानुसार धुळे शहर आणि तालुक्याच्या हद्दीत कार्यवाही करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून वाळू चोरांच्या विरोधात मोहिम उघडली आहे. वाहने पकडली जात आहेत. परंतु नदीपात्रामध्ये वाळू उपसा करणारे मजुर पथकाला पाहून पळ काढत असल्याने कारवाई करताना मर्यादा येत आहेत. पंरतु महसूल प्रशासन वाळू चाेरांच्या विरोधात आता कठाेर भूमिका घेणार आहे, असे तहसिलदार संजय शिंदे आणि गायत्री सैंदाणे यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे