शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सेवानिवृत्ती म्हणजे नवीन आयुष्याला सुरुवात - डॉ. तुषार रंधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 10:07 PM

उपशिक्षिका आशा वाघ यांचा सेवापुर्ती सोहळ्यात प्रतिपादन

शिरपूर : शाळेत येणारा विद्यार्थी हा मातीच्या गोळ्याप्रमाणे असतो. शिक्षक त्याला शिकवतात, संस्कार देतात़ समाज, कुटुंब, देशासाठी चांगला नागरिक घडवतात. म्हणून शिक्षकांचे कार्य मातीच्या गोळ्याला सुबक आकार देणाऱ्या कुंभाराप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्वपूर्ण आहे. म्हणून शिक्षक कधीही रिटायर्ड होत नाही. तर ते रिफ्रेश होऊन शेवटपर्यंत मार्गदर्शकाची भुमिका निभावतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी केले.शिरपूर येथील सौ.सावित्रीताई रंधे कन्या विद्यालय व श्रीमती के. एस. बर्वे उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका आशा वाघ यांचा सेवापुर्ती व सत्कार कार्यक्रम झाला. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. तुषार रंधे हे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे सचिव निशांत रंधे, खजिनदार लिला रंधे, भाजपा तालुका अध्यक्ष राहुल रंधे, विश्वस्त व नगरसेवक रोहित रंधे, ग.स. बँक संचालक शशांक रंधे, श्यामकांत वाघ, माजी जि.प.सदस्या सिमा रंधे, सारीका रंधे, के. डी.बच्छाव, भैय्या माळी, सिताराम माळी, रविंद्र वाघ, प्रा. कल्पेश वाघ, सागर वाघ, प्राचार्या मंगलापावरा, उपमुख्याध्यापक जे.के. सोनवणे, पर्यवेक्षिका जे.एल. पाटील उपस्थित होते.उपशिक्षिका आशा वाघ यांनी सत्काराला उत्तर दिले़ त्या म्हणाल्या, शिक्षकाचे काम अतिशय जबाबदारीचे असते. मुलींच्या शाळेत नोकरी करताना विद्याथीर्नींना आईच्या भूमिकेतुन चांगले संस्कार दिले. आज जरी मी सेवानिवृत्त होत असली तरी माझ्यातील शिक्षिका सेवानिवृत्त होणार नाही व यापुढे देखील शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना आणण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन स्मिता कोठारी यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे