लसीकरणाला मिळतोय प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:38 AM2021-05-08T04:38:16+5:302021-05-08T04:38:16+5:30

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी शहरातील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये २ मेपासून लसीकरण सुरू झाले. येथे रोज २०० जणांना ...

Response to vaccination | लसीकरणाला मिळतोय प्रतिसाद

लसीकरणाला मिळतोय प्रतिसाद

Next

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी शहरातील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये २ मेपासून लसीकरण सुरू झाले. येथे रोज २०० जणांना लस दिली जात आहे़ मात्र त्या ठिकाणी अन्य रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून ६ तारखेपासून आर. सी़ पटेल संस्थेच्या सहकार्यातून शहरातील क्रांतिनगरातील आर. सी़ पटेल मराठी प्राथमिक शाळेत लसीकरणात सुरुवात करण्यात आले. लसीकरण प्रभावी व गतिमान पद्धतीने व्हावे, रुग्णांना दिलासा मिळावा म्हणून माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या सहकार्याने व आरोग्य विभागाच्यावतीने एऩ एच़ यू. एम़ केंद्राअंतर्गत दररोज २०० डोसचे लसीकरण या ठिकाणी करण्यात येत आहे.

शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी क्रांतीनगर शाळेत लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सावलीसाठी मंडप, बसण्यासाठी खुर्च्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे.

तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षापुढील नागरिकांना पहिला डोस १७ हजार ५९८ तर दुसरा डोस २ हजार १४० नागरिकांना आतापर्यंत देण्यात आला आहे़ तसेच शुक्रवारपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी देखील होळनांथे, खर्दे, बोराडी, विखरण या ४ प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणाला सुरूवात झाली़

येथील उपजिल्हा रूग्णालयात पहिला डोस ७ हजार १०३ तर दुसरा डोस १ हजार ५९० नागरिकांना देण्यात आला आहे़ म्हणजेच या तालुक्यात आतापर्यंत पहिला डोस २४ हजार ७०१ तर दुसरा डोस ३ हजार ७३० लोकांना देण्यात आला आहे़

अफवांवर विश्वास ठेवू नका़

कोरोना लस ही सुरक्षित असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रसन्न कुलकर्णी यांनी केले आहे़

पटेल बंधूंचे लसीकरणासाठी सहकार्य़

शहरासह तालुक्यात लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्यास कमी गर्दीत लोकांना लसीकरणाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने पटेल परिवार शहरासह तालुक्यातील शाळांची इमारत उपलब्ध करून देणार आहेत़ शासन व प्रशासनाला लसीकरण मोहीम राबविण्यासाठी अजून इमारतींची गरज भासल्यास आमदार अमरिशभाई पटेल व उद्योगपती भूपेशभाई पटेल अजून इमारती उपलब्ध करून देणार आहेत़

रुग्णसंख्येत होणारी घट दिलासादायक

कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या वाढत आहे़ मागील पंधरवड्यापासून रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे़ यामुळे तालुक्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे़

Web Title: Response to vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.