शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:34 IST

कोरोनाची दुसरी लाट शहरासह जिल्ह्यात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. ही लाट भयंकर असून, धुळ्यासारख्या ठिकाणी रुग्णांची ...

कोरोनाची दुसरी लाट

शहरासह जिल्ह्यात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. ही लाट भयंकर असून, धुळ्यासारख्या ठिकाणी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत बाधित मृतांची संख्याही वाढू लागल्याने स्थानिक प्रशासनही चिंतेत सापडले. राज्य शासनाने कडक निर्बंध घालत वीकेंड लॉकडाऊन करणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. त्यानुसार, प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी कंबर कसली.

व्यापाऱ्यांकडूनही प्रतिसाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने निर्बंध लावल्यानंतर स्थानिक पातळीवर वीकेंड लागू करण्यात आला. यात सर्वाधिक व्यापाऱ्यांची भूमिका निर्णायक ठरली़ प्रशासनाने आवाहन केल्यानुसार, लहान-मोठ्या सर्वच व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंदच ठेवली होती. त्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने सर्वच व्यवहार ठप्प होती.

दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर शुकशुकाट

मेडिकल स्टोअर्स, कृषी संबंधित दुकाने वगळता सर्वच व्यवसाय बंद असल्याने, मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर, पाचकंदिल परिसरात शुकशुकाट दिसून आला. सर्वत्र बंद असल्याने बारा पत्थर, महात्मा गांधी पुतळा, अग्रसेन चौक, साक्री रोड, दत्त मंदिर परिसर, वाडीभोकर रोड, पारोळा रोड यासह अन्य महत्त्वाच्या चौकात शांतता पसरली होती. पहिल्या दिवसांप्रमाणे दुसऱ्या दिवशीही सर्वच व्यवहार बंदच होते. शुकशुकाट कायम होता.

कारवाईसाठी ठरावीक वेळच

वीकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांनी रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्यांना जाब विचारला होता. काही ठिकाणी तर चांगलाच चोपही दिला. हीच स्थिती दुसऱ्या दिवशी होती. नेहमीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस होते. मात्र, ठिकठिकाणी कारवाई करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा काही दिसून आला नाही. त्यांनीही पाठ फिरविल्याचे समोर आले. कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन असतानाही बिनधास्तपणे फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. पोलीसही ठरावीक ठिकाणी आणि ठरावीक वेळेतच दिसत असल्याने, बहुधा त्याचा फायदा अनेकांकडून घेतला जात असल्याचे समोर येत आहे. विविध ठिकाणी गर्दी दिसून येते. त्यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे.

घरात थांबणे पसंत

लॉकडाऊन, रविवार आणि दुपारचे कडक ऊन लक्षात घेता, बहुसंख्य जणांनी घराच्या बाहेर निघणे टाळले. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसांपेक्षा दुसऱ्या दिवशी रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण तसे नगण्यच होते.