जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी १० टक्के बेड आरक्षित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:38+5:302021-05-09T04:37:38+5:30

धुळे : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालयांमध्ये १० टक्के बेड आरक्षित करावेत; अथवा स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी ...

Reserve 10% beds for Zilla Parishad employees | जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी १० टक्के बेड आरक्षित करा

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी १० टक्के बेड आरक्षित करा

Next

धुळे : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालयांमध्ये १० टक्के बेड आरक्षित करावेत; अथवा स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय संघटनेने आरोग्य विभागाकडे केली आहे.

याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जिल्हा परिषद कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत कार्यालयात उपस्थित राहून काम करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्यात यावे. तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे तातडीने लसीकरण करावे, अशी मागणी आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संकट असताना शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे कर्मचारी काम करत आहेत. कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बेड उपलब्ध होत नाहीत. यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालयांमध्ये दहा टक्के बेड आरक्षित ठेवण्यात यावेत; अन्यथा जिल्हा व तालुकास्तरावर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी कोविड सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही अंशी कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. मात्र, अद्यापपर्यंत बहुतांश कर्मचारी लसीकरणापासून वंचित आहेत. याकरिता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्तरावर कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात यावी. कर्मचाऱ्यांना प्राधान्याने पहिला व दुसरा डोस द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदन देताना संघटनेचे वनराज पाटील, एकनाथ चव्हाण, मुकुंदा पगारे, मंगेश राजपूत, विजय पाटील, राजेंद्र देव, प्रवीण चौधरी उपस्थित होते.

Web Title: Reserve 10% beds for Zilla Parishad employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.