जवाहर स्टेडियमचे नुतनीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:36 PM2020-02-05T12:36:25+5:302020-02-05T12:37:36+5:30

महापालिका : तालुका तालिम संघाच्या पदाधिकाऱ्यांची महापौरांकडे मागणी

Renew Jawahar Stadium | जवाहर स्टेडियमचे नुतनीकरण करा

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील जवाहर कुस्ती स्टेडियचे नूतनीकरण करून कुस्तीपटूसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी तालुका तालीम संघाच्या वतीने मंगळवारी महापौर चंद्रकांत सोनार यांना निवेदन देण्यात आले़
यावेळी गोरख पाटील, नगरसेवक नागसेन बोरसे, नगरसेवक देवेंद्र सोनार, मुरलीधर लोकरे, वसंत हाराळ, रविंद्र माळी, नंदलाल फुलपगारे, संदीप पाटोळे, नगरसेवक विजय जाधव, दिनेश बागुल, समीर गवळी, राम कानडे, शाम कानडे, महेश माळी, आकाश परदेशी, प्रवीण जाधव, सनी वाघ, जगदीश सरोदे, कैलास कासार आदी उपस्थित होते. जवाहर कुस्ती स्टेडियमची दुरवस्था झाली आहे़
जवाहर कुस्ती स्टेडियमचे नूतनीकरण केल्यास कुस्तीपटूसाठी स्वंतत्र व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते़ देखरेख व नियोजनासाठी मनपाने एक विशिष्ट समिती स्थापन करण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली़

Web Title: Renew Jawahar Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे