शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची जिल्हाधिकारी कार्यालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:37 IST

धुळे : रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देण्यास सुरुवात केली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये जवळपास सर्वच ...

धुळे : रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देण्यास सुरुवात केली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये जवळपास सर्वच रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनचा आग्रह केला जात आहे. कुठूनही इंजेक्शन आणा, असे बेजबाबदार उत्तर देत खासगी डाॅक्टरांनी हात वर केले आहेत. रुग्ण सिरीयस झाल्याने इंजेक्शन द्यावेच लागेल, अशा शब्दात रुग्णांच्या नातेवाईकांना घाबरवले जात आहे. त्यातूनच या इंजेक्शनचा काळा बाजार फोफावत आहे. धुळे जिल्ह्यासाठी प्राप्त होणारी रेमडेसिविर इंजेक्शन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गरजेप्रमाणे आणि बेडच्या संख्येप्रमाणे सरकारी तसेच खासगी रुग्णालयांना वितरीत केली जातात. आवश्यकता असेल तरच इंजेक्शन देण्याच्या सक्त सूचना आहेत. या सूचनांचे सरकारी रुग्णालयांमध्ये तंतोतंत पालन होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारी कोविड सेंटरमध्ये दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागत नाही. परंतु खासगी रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांचे नातेवाईक मात्र शहरातील विविध औषधालयांमध्ये खेटा घालताना रोज दिसत आहेत. धुळे शहरातील साक्री रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल रुग्णाचे नातेवाईक बुधवारी भरदुपारी दीड वाजता धावत पळत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी कुणाला भेटायचे, अशी चाैकशी त्यांनी केली. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात इंजेक्शन मिळत नाही, असे त्यांना सांगण्यात आले. रुग्णाचा ऑक्सिजन कमी होत असल्याने त्वरित इंजेक्शन द्यावे लागेल, असे डाॅक्टरांनी सांगितल्याचे ते म्हणाले. शिवाय रेमडेसिविर दिल्यावर ऑक्सिजन वाढतो का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याच्या आधी त्यांचा औषध प्रशासन विभागातील एका कर्मचाऱ्याशी फोनवर वाद झाला होता. याआधी काळ्या बाजारात २० हजाराला इंजेक्शन विकत घ्यावे लागल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा संताप त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. सुदैवाने राम नवमीनिमित्त कार्यालयांना सुटी असल्याने प्रशासनाची लाज राखली गेली. अन्यथा रुग्णाच्या या दोन नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालय डोक्यावर घेतले असते, यात शंका नाही. रुग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची ही एकच घटना नसून दररोज रुग्णांचे अनेक नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात इंजेक्शन मिळते, असे त्यांना कुणी सांगितले आणि खासगी रुग्णालयांना दिली जाणारी इंजेक्शन जातात कुठे, असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.

कोरोना झालाच आहे तर कोर्स पूर्ण करून घ्या

कोरोना झालेल्या सर्वच रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देणे योग्य नसल्याचे आरोग्य विभागाने आधीच स्पष्ट केले आहे. अत्यवस्थ असलेल्या विशिष्ट रुग्णांना आवश्यकता भासली तरच इंजेक्शन द्यावे, अशा सूचना आहेत. असे असताना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या सर्वच कोरोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनचा आग्रह धरला जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. तुम्हाला इंजेक्शनची गरज नसली तरी आता रुग्णालयात दाखल झालाच आहात तर रेमडेसिविरचा कोर्स पूर्ण करुन घ्या, असा चुकीचा सल्ला दिला जात आहे. इंजेक्शनची चिठ्ठी हातात देऊन कुठूनही इंजेक्शन आणा, असे सांगितले जात असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये इंजेक्शनसाठी आग्रह धरला जात असल्याने त्यांनीच इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे, अशा प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांच्या आहेत.

बुधवारी २४३ इंजेक्शनचे वाटप

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सरकारी तसेच खासगी रुग्णालयांना दररोज इंजेक्शनचे वितरण होत आहे. प्राप्त झालेला साठा त्वरित वितरीत केला जातो. बुधवारी धुळे शहरातील सरकारी, खासगी रुग्णालयांना २०१ इंजेक्शन वितरीत केली. साक्री तालुक्यात १५, शिरपूर तालुक्यात १२ आणि दोंडाईचा येथील तीन रुग्णालयांना ९ इंजेक्शन दिली आहेत. जिल्ह्यात एकूण २४३ इंजेक्शनचे बुधवारी वाटप करण्यात आले.