रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकाची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:37 AM2021-04-22T04:37:33+5:302021-04-22T04:37:33+5:30

रेमडेसिविरचा अगोदरच तुटवडा आहे. त्यातच खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांना रेमडेसिविर आणण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ होत ...

Relatives of patients hit the collector's office for remediation | रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकाची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकाची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

Next

रेमडेसिविरचा अगोदरच तुटवडा आहे. त्यातच खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांना रेमडेसिविर आणण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. जादा पैसे देऊनही काहींना हे इंजेक्शन मिळत नाही. अशातच शहरातील एका रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकाला जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसिविर इंजेक्शन मिळत असल्याची माहिती मिळाली. इंजेक्शन मिळेल या आशेने त्यांनी भरदुपारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रेमडेसिविरसाठी कोणाला भेटावे लागेल याची चौकशी केली. मात्र, याठिकाणी इंजेक्शन मिळत नसल्याचे त्यांना काहींना सांगितल्यावर ते संतापात निघून गेले. या अगोदर या नातेवाईकांचा औषध प्रशासनाच्या एका कर्मचाऱ्याशी फोनवर वाद झाल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, रेमडेसिविर घेण्यासाठी दररोज गरजू रूग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात धडकत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, यासंदर्भात औषध प्रशासन विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त महेश देशपांडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

औषध प्रशासनाशी संपर्क करू : सरदेसाई

आजचा प्रकार आमच्यापर्यंत आलेला नाही. मात्र, ज्या रूग्णाच्या नातेवाईकाला गरज आहे, त्याला ते इंजेक्शन मिळवून देण्यासाठी औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधला जाईल, असे उपजिल्हाधिकारी तथा रेमडेसिविर नियंत्रण पथकाच्या प्रमुख मधुमती सरदेसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Relatives of patients hit the collector's office for remediation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.