शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

महागाई कमी करा; पदोन्नती, ओबीसी आरक्षण, रोजगार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST

विविध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीचे धरणे आंदोलन धुळे : महागाई कमी करा, पदाेन्नती, ओबीसी आरक्षण आणि बेरोजगारांना रोजगार द्या, ...

विविध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीचे धरणे आंदोलन

धुळे : महागाई कमी करा, पदाेन्नती, ओबीसी आरक्षण आणि बेरोजगारांना रोजगार द्या, यांसह इतर मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीने मंगळवारी धुळ्यात एक दिवसीय धरणे आंदोलन केले. बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता धुळे शहरात क्युमाईन क्लब रस्त्यावर धरणे आंदोलन केले. यावेळी शासनाच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली. मागासवर्गीयांचे पदाेन्नतीमधील संविधानिक आरक्षण बेकायदेशीरपणे रद्द केल्यामुळे मागासवर्गीय समाजावर अन्याय झाला आहे. मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदाेन्नतीपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी आंदोलकांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाच्या मार्फत राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, मुख्य सचिव यांना निवेदन दिले.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष आनंद सैंदाणे, उपाध्यक्ष प्रदीप शिरसाठ, विजय मोरे, नाना शिंदे, सुरेश अहिरे, ॲड. संदीप जावरे, अजय गायकवाड, ईश्वर जाधव, भास्कर महिरे, चेतन वाघ, अनिल वाघ, मंगलदास वाघ, संगम बागुल, नरेश गांगुर्डे, ॲड. सतीश अहिरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

... या आहेत मागण्या

विशेष नोकर भरती मोहीम राबवून ४.५ लाखांचा बॅकलाॅग भरावा, ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पूर्ववत द्यावे, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करून महागाई नियंत्रणात आणावी, कोरोनामुळे अनेक कुटुंबे बेरोजगार झाली असून, त्यांचे वीजबिल माफ करावे, बियाणे, खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, त्यांना निलंबित करावे, प्रचलित १०० बिंदूनामावलीनुसार राज्यात शंभर टक्के प्राध्यापक भरती करावी, ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्यातील आरोपी धीरज चाैधरी यास तत्काळ अटक करावी, आरोपीला अभय देणाऱ्या तपास अधिकाऱ्यांचे निलंबन करावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. या मागण्यांवर त्वरित कार्यवाही केली नाही तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बहुजन समाज पार्टीने दिला आहे.