राम जन्मला गं सखे..राम जन्मला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:37 AM2021-04-22T04:37:25+5:302021-04-22T04:37:25+5:30

धुळे शहरात शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली तीन राममंदिर आहेत. त्यात जुना आग्रारोड, खोलगल्ली (गल्ली नं.२) व जुन्या धुळ्यातील सुभाष ...

Ram Janmala Gam Sakhe..Ram Janmala ... | राम जन्मला गं सखे..राम जन्मला...

राम जन्मला गं सखे..राम जन्मला...

Next

धुळे शहरात शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली तीन राममंदिर आहेत. त्यात जुना आग्रारोड, खोलगल्ली (गल्ली नं.२) व जुन्या धुळ्यातील सुभाष नगरातील मंदिरांचा समावेश आहे.

शहरातील जुने आग्रा रोडवरील पट्टाभिषिक्त श्रीराम मंदिर संस्थानास अनेक वर्षांची परंपरा आहे. येथे दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत रामाचे नवरात्र साजरे करण्यात येते. मात्र कोरोनाच्य पार्श्वभूमीवर यावर्षी ते रद्द करण्यात आले होते. या मंदिरात उत्सव मूर्तींना फुलांनी सजविण्यात आलेले होते. लहान पाळणाही सजविण्यात आलेला होता. त्यात श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या चांदीच्या मूर्ती ठेवण्यात आल्या. दुपारी ठीक १२ वाजता फुलांच्या पाकळ्या व अक्षतांची उधळण करीत श्रीरामाचा जयघोष करीत जन्मोत्सव साजरा झाला. या ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते. मंदिर परिसरात आठ दहा भाविक होते तर काही भाविकांनी मंदिराच्या बाहेर उभे राहून प्रभू रामाचे दर्शन घेतले.

सुभाषनगरातील राममंदिर

जुने धुळ्यातील सुभाष नगरात असलेल्या राममंदिरातही राम जन्माचा सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत व भक्तिमय वातावरणात साजरा झाला. या मंदिरातही फुलांची सजावट केलेली होती. उत्सव मूर्तींना सजविण्यात आले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास जन्मोत्सव साजरा झाला. तसेच खोलगल्लीतही दुपारी १२ वाजेच्या सुमारास जन्मोत्सवाचा कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा झाला.

Web Title: Ram Janmala Gam Sakhe..Ram Janmala ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.