कालवा दुरुस्तीने रब्बीला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 01:16 PM2020-02-28T13:16:49+5:302020-02-28T13:17:21+5:30

अमरावती प्रकल्प : २ हजार ६०६ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार

Rabbi benefits by canal repair | कालवा दुरुस्तीने रब्बीला फायदा

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या दुरुस्ती व साफसफाई काम झाल्यामुळे याचा रब्बी हंगामातील बागायती क्षेत्र तसेच आगामी खरीप हंगामाच्या कापूस लागवडीसाठी चांगला फायदा होणार आहे.
यामुळे दोन हजार ६०६ हेक्टर जमिनीला तसेच कालव्याला लागून असलेल्या विहिरींना देखील याचा लाभ होणार आहे.
मालपुरसह सुराय, चुडाणे, दोंडाईचा तसेच अप्रत्यक्षपणे खर्दे, मांडळ, विखरण या गावांचा देखील आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच बागायती क्षेत्रात वाढ होईल. यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला गेल्याचे फलित असल्याने मालपूर, सुराय, विखरण येथील ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. उजवा कालवा १४ कि.मी. तर डावा कालवा सहा कि.मी. लांबीचा आहे. अनेक वर्षांपासून हे कालवे बंद असल्यामुळे गाळ तसेच काटेरी झुडपांमुळे हे कालवे पुर्णपणे नादुरुस्त होते. यामुळे धरणातील पाणी शेती तसेच शेत बांधापर्यंत पोहचत नव्हते. तसेच परिणामी विहिरीची देखील पाणी पातळी खालावत होती. यामुळे विहिरींना पाणी कायमस्वरूपी टिकून रहाणार आहे. पाटचाऱ्या तसेच कालव्याची दुरुस्तीची मागणी शेतकऱ्यांनी ‘लोकमत’मधून केली होती. त्यानुसार दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्णत्वास आले. तसेच कलवाडे फाटा जवळ कालवा खोलीकरण करवा यामुळे धरण बांधाजवळील पाझर कमी होणार आहे व तेथील शेतकºयांची शेती नुकसान देखील वाचणार आहे. ही मागणी मात्र शेतकºयांची कायम आहे. याकडे देखील लक्ष केंद्र्रित करावे, अशी मागणी केली आहे. सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे यासाठी काम केले. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे तरच यापाण्याचा फायदा यासाठी शेतकºयांनी पाणी मागणी अर्ज भरून सहकार्य करावे असे येथील प्रकल्प अभियंता प्रशांत खैरनार यांनी सांगितले.

Web Title: Rabbi benefits by canal repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे