शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २३७ पैकी २३४ मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 22:22 IST

पोलिसांचा तगडा बंदोबस्त, मतमोजणीकडे लक्ष लागून

धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी धुळे जिल्हयातील चारही केंद्रावर मंगळवारी शांततेत मतदान झाले. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. दुपारीच मतदानाची प्रक्रीया पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वच केंद्रावर मतदारांची योग्य ती काळजी घेण्यात आली. जिल्हयातील २३७ पैकी २३४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ९९ टक्के एवढी राहिली. आता सर्वांचे लक्ष गुरूवारी जाहीर होणाऱ्या मतदानाच्या निकालाकडे लागले आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केल्याने माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही पोट निवडणूक घेण्यात आली. विशेष म्हणजे भाजपतर्फे या जागेवर पुन्हा अमरिशभाई पटेल यांना संधी देण्यात आली. तर काँग्रेसचे अभिजीत पाटील हे महाआघाडीचे उमेदवार आहेत.आज सकाळी धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य हे एकत्रितपणे खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली मतदान केंद्रावर पायी चालत आले. काँग्रेसचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी देखील धुळ्यातील तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला भेट देत पाहणी केली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, राष्ट्रवादीचे किरण शिंदे आदी उपस्थित होते. शिंदखेडा येथे आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली तर शिरपूरला उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे मतदार मतदानासाठी गेले होते. एकाचवेळी सर्व मतदार आल्याने, धुळे येथील मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी झालेली होती.कोरानाचे नियम पाळलेकोरोनामुळे सर्व नियम पाळून मतदान प्रक्रीया पार पाडण्यात आली. मतदार, मतदान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मास्क परिधान केले होते. शाररिक अंतर ठेवून एकाचवेळी गर्दी होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली होती. प्रत्येक मतदाराचा ताप आणि ॲाक्सिजनची पातळी मोजूनच त्यांना मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येत होता.प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचारी असे चार केंद्रावर २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे