शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

६११३ क्विंटल भरडधान्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:55 IST

धुळे जिल्हा : नाफेड तर्फे चार केंद्रावर २१ हजार क्विंटलची हरभऱ्याची खरेदी

धुळे : महाराष्टÑ शासनाच्या अन्ननागरी पुरवठा विभागातर्फे यावर्षी ज्वारी, मका या भरडधान्याचे आॅनलाईन खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. धुळे जिल्ह्यात चार खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. जिल्ह्यातील १४८ शेतकऱ्यांकडून आतपार्यंत ६ हजार ११३ क्विंटल ज्वारी व मक्याची खरेदी करण्यात आलेली आहे. तर केंद्र सरकारच्या नाफेड मार्फत जिल्ह्यातील चार केंद्रावर तब्बल २१ हजार क्विंटल हरभरा खरेदी झालेली आहे. हरभरा खरेदीसाठी शासनाने अजून मुदतवाढ दिलेली आहे.पूर्वी ज्वारी, मका या भरडधान्याची खरेदी हमी भाव न देताच केली जात होती. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. मात्र शासनाने आता भरडधान्य हमीभावाने खरेदी करण्यास सुरूवात केलेली आहे.राज्य शासनाने निश्चित केल्यानुसार १ ते ३० जून २०२० या कालावधीत रब्बी हंगामातील ज्वारी, मक्याची या भरडधान्याची हमीभावाने खरेदी सुरू झालेली आहे.मक्याला १७६० रूपये तर ज्वारीला २५५० रूपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आलेला आहे.जिल्ह्यात चार केंद्रनाफेडतर्फे धुळे जिल्ह्यात धुळ्यासह शिरपूर, दोंडाईचा व साक्री येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली होती.३१००शेतकºयांनी केली नोंदणीभरडधान्य आॅनलाइन खरेदीसाठी जिल्ह्यातील ३१०० शेतकºयांनी नोंदणी केलेली होती. त्यात मका खरेदीसाठी २५०० तर ज्वारी खरेदीसाठी ६०० शेतकºयांचा समावेश होता. त्यापैकी १४८ शेतकºयांकडून प्रत्यक्ष मका व ज्वारीची खरेदी करण्यात आली. त्यात मका ११७ तर ३१ शेतकºयांकडून ज्वारीची खरेदी करण्यात आलेली आहे.६११३क्विंटल धान्य खरेदीजिल्ह्यातील केंद्रावर एकूण ६ हजार ११३ भरडधान्याची खरेदी करण्यात आलेली आहे. यात मक्याची ५ हजार ५४०.५० क्विंटल तर ज्वारीची ५७३ क्विंटल खरेदी करण्यात आली.ज्वारीची फक्त धुळ्यातच खरेदीदरम्यान जिल्ह्यातील चार पैकी फक्त धुळे येथील केंद्रावरच ज्वारीची खरेदी झालेली आहे. उर्वरित शिरपूर, दोंडाईचा, साक्री या केंद्रावर ज्वारीची आवकच झालेली नसल्याचे सांगण्यात आले.तूर खरेदीला कमी प्रतिसादनाफेडतर्फे गेल्या हंगामात तूर खरेदी करण्यात आली होती. जिल्हयातील १९६ शेतकºयांकडून १४२९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आलेली आहे. यावेळी तुर खरेदीला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे