शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

३०० रूपयांची लाच घेतांना दुय्यम निबंधकासह पंटरला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 21:19 IST

लाचलुचपत विभागाने सापळा रचून केली कारवाई

शिरपूर : शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खताची रजिस्टर नोंदणी करण्यासाठी ३०० रूपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी दुय्यम निबंधकासह एका खाजगी पंटरला लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली़१८ रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास येथील दुय्यम निबंधक कार्यालयात लाचलुचपत विभागाच्या धुळे पथकाने दुय्यम निबंधकासह एका खाजगी पंटरला ३०० रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली़नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक श्रेणी १ येथील कार्यालयातील दुय्यम निबंधक अरुण संभाजी कापडणे (५४) रा़जत्रा हॉटेलजवळ, कोणार्क नगर मनोमय ड्रीम होम नाशिक व खाजगी इसम सुनिल उर्फ छोटू पंडीत बाविस्कर (४३) रा़वाघाडी ता़शिरपूर यांनी तक्रारदार वकील हे त्यांच्याकडील पक्षकाराचे खरेदीखत रजिस्टर नोंदणी करावयाची असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तुर या नात्याने नोंदणी करीता गेलेत़ त्यावेळी त्यांच्याकडून दस्त नोंदणीचे बदल्यात ४०० रूपयांची लाचेची मागणी केली़ त्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली असता तडजोडी अंती ३०० रूपयांची लाच घेतांना दोघांना ताब्यात घेण्यात आले़सदर कारवाई नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे, पोलिस उपअधिक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळ्याचे सापळा अधिकारी मंजितसिंग चव्हाण, सहा.सापळा अधिकारी प्रकाश झोडगे, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, संदीप सरग, भुषण खलानेकर, भूषण शेटे यांच्या पथकाने ही कारवाई केली़

टॅग्स :Dhuleधुळे