शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

धुळ्यात मास्क न घालणाऱ्या ८ पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडाची नामुष्की!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 10:04 PM

पोलीस मुख्यालयाजवळ कारवाई : मोहीम सुरुच राहण्याचे संकेत

धुळे - विनामास्क फिरणाºयांवर महापालिका आणि पोलीस विभागाकडून कारवाई केली जात आहे़ बसस्थानकासमोरील पोलीस मुख्यालयाजवळ विनामास्क फिरणाºया ८ पोलीस कर्मचाºयांना उपअधीक्षक प्रदीप पाडवी, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पकडले़ सर्वसामान्य नागरीकांप्रमाणे त्यांच्याकडून सुध्दा २०० रुपये दंडाची पावती रितसर फाडण्यात आली़ दरम्यान, पोलीस पोलिसांना सोडत नसल्याने आता तरी सामान्य लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे़शहरात सध्या कोरोना विषाणुचा संसर्ग पुन्हा वाढताना दिसून येत आहे़ त्या अनुषंगाने प्रशासनाने नागरीकांना मास्क व सॅनिटायझर वापरणेबाबत निर्बंध लावलेले आहेत़ तरीही काही नागरीकांकडून मोठ्या प्रमाणावर निर्बंधाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे़ शहर व परिसरात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी विनामास्क फिरुन नियमभंग करीत असल्याचे निदर्शनास येत होते़ त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी अशा पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत कारवाई करण्याचे आदेश केले होते़ प्रभारी उपअधीक्षक प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे, कर्मचारी भिला पाटील, संदिप पाटील, मुख्तार मन्सुरी, सचिन साळूंखे, प्रसाद वाघ, नरेंद्र परदेशी, सोनवणे यांनी पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबून विनामास्क लावणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली़ त्यात ८ पोलीस कर्मचारी सापडले़ त्यांच्यावर देखील प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली़ त्यांना सन्मानपुर्वक नवीन मास्क देवून त्यांना योग्य अशी समज देण्यात आली़ त्यानंतर ही मोहीम जिल्हा न्यायालय परिसर, तहसील कार्यालय परिसर या ठिकाणी जावून विनामास्क फिरणाºयांना पकडून दंड ठोठावण्यात आला़

टॅग्स :Dhuleधुळे