शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शिरपुरात व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर जनता कर्फ्यूला बसला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 22:08 IST

पालिकेत मुख्याधिकारी अमोल बागुल यांची भेट

शिरपूर : शहरात १७ ते २१ दरम्यान पाच दिवसांचा सर्वपक्षीय जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला होता. परंतू शहरातील व्यापाऱ्यांनी त्याला विरोध करीत आपले व्यवहार सुरु ठेवणार असल्याची भूमिका घेतली. तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना निवेदन दिले. तेव्हा मुख्याधिकाºयांनी हा निर्णय सर्वपक्षीय आहे. त्यात आमचा सहभाग नाही. त्यामुळे व्यापारी प्रतिष्ठान खुल्या ठेवणाºयाविरोधात कुठली कारवाई करण्यात येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर व्यापाºयांनी जनता कर्फ्यू रद्द झाला असल्याचे जाहीर करुन आपली व्यवहार सुरु ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी १७ ते २१ जून असे ५ दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करण्याचे जाहिर केले होते. तसेच संदेश सोमवारी रात्रीपासून सोशल मिडियावर सर्वच ग्रुपवर पसरले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच याच्याविरोधात व्यापाºयांचा विरोध सुरु होता. सर्वच व्यापारी यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यासाठी दुपारी शिष्टमंडळासह गेले. पालिकेत मुख्याधिकारी अमोल बागुल यांची भेट घेऊन व्यापाºयांनी त्यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, अर्थचक्र सावरण्यासाठी लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय घेतला आहे़ ८० दिवसाच्या लॉकडाऊननंंतर शहरात कुठेतरी उभा राहीला आहे. लोक आता खरेदीसाठी बाहेर येऊ लागलेत़ संपूर्ण भारतात सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहे. मात्र ते वगळता शहरात सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत या मर्यादित कालावधीतच बाजारपेठ व दुकाने सुरु असतात. सलग दुसºयांंदा जनता कर्फ्यू या गोंडस नावाखाली व्यवहार व बाजारपेठ बेकायदेशीरपणे बंद करणे म्हणजे सर्वसामान्य गरजुंच्या पोटावर पाय देणे आहे. यापूर्वी शहराची बाजारपेठ बंद असल्यामुळे शासनाचे, शेतकरी बांधवाचे शेती पुरक, कामगार व व्यापाºयांचे जवळपास २ हजार कोटीची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे़ जनता कर्फ्यूच्या निर्णयाला व्यापाºयांसह शहरातील सर्व घटकांतून असलेल्या विरोधाचे प्रमाण लक्षात घेता तो बहुतेक जनतेला नामंजूर असल्याचे दिसून येते. सोशल मिडियावर निनावी आव्हान करून बंद करण्याची घोषणा करणे संतापजनक आहे. त्यामुळे या लादलेल्या बंदला व्यापारांचा विरोध आहे. व्यापाºयांनी शिरपूर बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून ज्या-ज्या लिखित सुचना आहे. त्याचे काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मराठा व्यापारी संघटना, किराणा व्यापारी असोसिएशन, सिडस् अ‍ॅण्ड पेस्टीसाईड असोसिएशन, गांधी मार्केट, शिवाजी मार्केट, धाना बाजार, सिंधी मार्केट, नेहरू रोड परिसरातील व्यापाºयांच्या स्वाक्षºया आहेत़पालिकेचे आश्वासनहा जनता कर्फ्यू सर्वपक्षीय आहे. हा पालिका प्रशासनाचा निर्णय नाही. त्यामुळे या जनता कर्फ्यूमध्ये कोणाला सहभागी व्हायचे ते त्याने ठरवावे. आम्ही कोणावरही कारवाई करणार असे आश्वासन मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी दिले. त्यानंतर व्यापाºयांनी आपले व्यवसाय सुरु ठेवण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे