शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आमळी येथे आजपासून यात्रोत्सवास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:07 IST

कन्हैयालाल महाराज : यात्रेत होते लाखोंची उलाढाल, मंदिर ट्रस्टसह ग्रामपंचायत प्रशासन सज्ज

दहिवेल : साक्री तालुक्यातील आमळी येथील प्रसिद्ध श्री कन्हैय्यालाल महाराज यात्रोत्सवास शुक्रवापासून प्रारंभ होत आहे. त्या साठी जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर परिसर रोशणाईने झगमगला आहे. एसटी महामंडळातर्फे जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.या यात्रोत्सवाला केवळ राज्यातीलच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश या नजीकच्या राज्यातूनही भाविक बहुसंख्येने सहभागी होतात. यात्रेकरीता ग्रामस्थांसह व्यावसायिक वर्ग एक महिना आधीपासून तयारीला लागतात. यात्रोत्सवाला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने पहाटेपासूनच दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर परिसरासह दर्शनाच्या रांगा लागतात. मंदिर परिसरासह यात्रेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गर्दीमुळे हॉटेल सजली असून पाळणे, लोकनाट्य (तमाशा), खेळांचे साहित्य व फळांच्या दुकानांवरही गर्दी दिसत आहे.व्यावसायिकांनी यात्रोत्सवात विविध साहित्य विक्रीची दुकाने थाटली असून भाविकांचे आगमन होण्यास सुरूवातही झाली आहे. ग्रा.पं.ने पाणी, वीज आदी मूलभूत सुविधांसह उत्सवासाठीच नियोजन ग्रामसभा घेऊन केले आहे. यात्रेनिमित्त जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, वीज वितरण कंपनीने पूर्णपणे तयारी केली आहे.यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पिंपळनेरचे सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, यांनी आमळीला भेट देऊन यात्रोत्सवाच्या परिसराची पाहणी करून बंदोबस्ताचे नियोजन केले. वीज महावितरण कंपनीतर्फे सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संपूर्ण खान्देशातून यात्रोत्सवात हजारो भाविक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले असून शुक्रवारी झुंबड उडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Dhuleधुळे