शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
5
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
6
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
7
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
8
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
9
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
10
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
11
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
12
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
13
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
14
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
15
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
16
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
17
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
18
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
19
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नागेश्वर येथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास थाटात सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 12:05 IST

तब्बल दोन किलोमीटर अंतरापर्यंत होती शोभायात्रा, हजारो भाविक सहभागी आॅनलाइन लोकमत शिरपूर (जि. धुळे ) : शिरपूर-चोपडा मार्गावरील अजनाड बंगला ...

तब्बल दोन किलोमीटर अंतरापर्यंत होती शोभायात्रा, हजारो भाविक सहभागीआॅनलाइन लोकमतशिरपूर (जि.धुळे) : शिरपूर-चोपडा मार्गावरील अजनाड बंगला गावाजवळील नागेश्वर येथे नागेश्वर सेवा संस्थानच्यावतीने प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमाला सोमवारपासून जल्लोषात सुरूवात झाली़ तब्बल २ किलोमीटर अंतरापर्यंत शोभायात्रा काढून हजारो भाविक सहभागी झाले होते़२४ रोजी अजनाड बंगला गावापासून सवाद्य मिरवणुकीला सुरूवात झाली़ अग्रभागी उंटस्वार, घोडेस्वार, मंगल वाद्य, गणेश मूर्तीचा रथ, बँण्ड पथक, शिवलिंगरथासह विविध रथ, वल्हर वाद्य, बंजारा नृत्य, आदिवासी नृत्य, नाशिक ढोलपथक, होते़ या मिरवणूकीत तब्बल १० वेगवेगळ्या रथावर मूर्ती ठेवल्या होत्या.घराघरांसमोर रांगोळी़़़अजनाड बंगला गावापासून मिरवणुकीला सुरूवात झाली़ गावातील प्रत्येक घरांसमोर रांगोळी व मंदिराच्या मार्गावर सुध्दा रांगोळी काढून परिसर सजविण्यात आला होता़संताची उपस्थिती़़़या चार दिवसीय सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी राष्ट्रीय संत लक्ष्मण चैतन्य, राष्ट्रीय संत आनंद चैतन्य महाराज, सखाराम महाराज अमळनेरकर तसेच आशा दिदी दोंडाईचा, महेश महाराज बभळाज, डॉ.किमया आमले यांचे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळा़२६ रोजी सकाळी ७ वाजता प्रधान होम, कलशरोहण सोहळा, दुपारी १२ वाजता प्राणप्रतिष्ठा कलशरोहण तर सायंकाळी ७ वाजता राष्ट्रीय संत आनंद चैतन्य महाराज यांचा गीता रामायण सत्संग व दिपोत्सव कार्यक्रम होईल. यावेळी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.गुरूवारी महाप्रसाद वाटप़२७ रोजी सकाळी ८ वाजता उत्तरांग हवन, पूर्णाहूती आरती तर रात्री ८ वाजता राष्ट्रीय संत आनंद चैतन्य महाराज यांचा गीता रामायण सत्संग कार्यक्रम होईल. तत्पूर्वी, सकाळी ११ वाजेपासून महाप्रसाद वाटप करण्यात येईल.

टॅग्स :Dhuleधुळे