धुळे येथील पुलावरील कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:35 AM2019-11-19T11:35:07+5:302019-11-19T11:35:29+5:30

तिखी गावाजवळील नाल्यावरही कठडे बसविण्याची गरज

The possibility of an accident due to the collision on the bridge at Dhule | धुळे येथील पुलावरील कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता

धुळे येथील पुलावरील कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता

googlenewsNext

आॅनलाइन लोकमत
धुळे : मोगलाईजवळील असलेला पुल तसेच तिखी गावाजवळ असलेल्या नाल्यावरील कठडे तुटल्याने, अपघाताची शक्यता असून, या पुलांवर त्वरित कठडे बसविण्यात यावेत, अशी वाहनधारकांची मागणी होऊ लागली आहे.
मोगलाई भागातील पुलाचे
कठडे गायब
मोगलाई-गवळीवाडा परिसरात असलेल्या पांझरा नदीवर तीन-चार वर्षांपूर्वी ब्रिज कम बंधारा बांधण्यात आला होता. हा पादचारी पूल मोगलाई परिसर व प्रमोद नगरातील सेक्टर २ ला जोडणारा आहे. या पुलावर लोखंडी कठडे लावण्यात आले होते. मात्र अवघ्या दोन वर्षातच या पुलावरील कठडे गायब झालेले आहेत. रात्रीच्यावेळी या पुलावर अनेकदा अंधार असतो. त्यामुळे पुलाखाली पडण्याची भीती असते. दोन दिवसांपूर्वीच रात्रीच्यावेळी या पुलावरून एक पादचारी पडला होता. त्यामुळे या पुलावर आता लोखंडी कठडे लावण्याऐवजी सिमेंटचे कठडे लावण्यात यावेत अशी मागणी होऊ लागली आहे.
तिखी गावाजवळील
पुलाचे कठडे तुटले
दरम्यान धुळे-औरंगाबाद रस्त्यावरील तिखी गावाजवळ छोटा पूल असून, त्यावरील लोखंडी कठडे तुटले आहे. या मार्गावरून वाहनांची वर्दळ असते. पुलावरून वाहने खाली पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलावरील कठडेही बसविण्यात यावे, अशी वाहनधारकांची मागणी आहे.

Web Title: The possibility of an accident due to the collision on the bridge at Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे