शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी प्रयोगशाळेतील पॉझिटिव्हिटी दर तब्बल ४६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST

- भूषण चिंचोरे धुळे : जिल्ह्यातील कोरोनाचा ग्राफ वाढला आहे. चाचण्यांची संख्या, बाधितांचे प्रमाण व पॉझिटिव्हिटी दरात मोठी वाढ ...

- भूषण चिंचोरे

धुळे : जिल्ह्यातील कोरोनाचा ग्राफ वाढला आहे. चाचण्यांची संख्या, बाधितांचे प्रमाण व पॉझिटिव्हिटी दरात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, खाजगी प्रयोगशाळेतील पॉझिटिव्हिटी दर तब्बल ४६ टक्के इतका झाला आहे. पॉझिटिव्हिटी दर वाढल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. अँटिजन चाचण्यांसोबतच अधिक आरटीपीसीआर चाचण्या करण्यावर भर दिला जातो आहे.

१ मार्च ते २० मार्च या कालावधीत २६ हजार १० चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५ हजार ४१४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हिटी दर तब्बल २०.८२ इतका झाला आहे. म्हणजेच १०० जणांची चाचणी केली तर २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव शहरी भागासोबतच ग्रामीण भागात वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये चाचण्यांची संख्या दुप्पट झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात १० हजार चाचण्या -

फेब्रुवारी महिन्यात १० हजार ४९९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ९२३ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. फेब्रुवारीत पॉझिटिव्हिटी दर ८.८५ टक्के इतका होता. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यानंतर चाचण्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते.

जानेवारीत पॉझिटिव्हिटी दर केवळ ३ टक्के -

मार्चमध्ये पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांच्या वर गेला आहे. मात्र, जानेवारी महिन्यातील पॉझिटिव्हिटी दर केवळ ३ टक्के इतका होता. म्हणजेच १०० चाचण्यांमागे केवळ ३ अहवाल पॉझिटिव्ह येत होते. जानेवारीत एकूण १२ हजार २१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी फक्त ३७० अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

खाजगी प्रयोगशाळेची पॉझिटिव्हिटी तब्बल ४६ टक्क्यांवर -

मार्चमध्ये आतापर्यंत एकूण २६ हजार ४९९ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी शासकीय रुग्णालयात ११ हजार ३६८ चाचण्या केल्या गेल्या. त्यापैकी २ हजार ४८२ अहवाल पॉझिटिव्ह आले असून पॉझिटिव्हिटी २१.६६ टक्के इतकी आहे. खाजगी प्रयोगशाळेत ३ हजार ८५० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १ हजार ७७८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खाजगी प्रयोगशाळेतील पॉझिटिव्हिटी तब्बल ४६.१८ टक्के इतकी आहे. अँटिजन चाचण्यांची संख्या १० हजार ७७२ इतकी आहे. त्यापैकी १ हजार १७४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अँटिजन चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर १०.८८ टक्के आहे.

प्रतिक्रिया -

विलगीकरणातील रुग्णांनी खबरदारी घ्यावी -

जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढली आहे. मात्र, बहुतांश रुग्णांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. त्यामुळे असे रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, आपल्यामुळे कुटुंब व मित्रपरिवाराला धोका होईल असे वर्तन करू नये. कोणतेही लक्षणे नसतील मात्र कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल तर सर्व नियम पाळून विलगीकरणात राहावे.

- डॉ. विशाल पाटील, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी

ग्राफ साठी -

असा वाढला कोरोनाचा ग्राफ

जानेवारी -

चाचण्या - १२ हजार २१

पॉझिटिव्ह - ३७०

पॉझिटिव्हिटी - ३.८ टक्के

फेब्रुवारी

चाचण्या - १० हजार ४९९

पॉझिटिव्ह - ९२३

पॉझिटिव्हिटी - ८.८५ टक्के

मार्च (२० मार्चपर्यंत)

चाचण्या - २६ हजार १०

पॉझिटिव्ह - ५ हजार ४१४

पॉझिटिव्हिटी - २०.८२ टक्के